महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायल-हिजबुल्ला युद्धाचा धोका वाढला

06:42 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहशतीमुळे लोकांकडून स्थलांतर

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

लेबनॉनच्या हिजबुल्लाने गोलन टेकड्यांवर रविवारी रॉकेट्सनी हल्ले केले होते. एका फुटबॉल मैदानात कोसळलेल्या रॉकेट्समुळे 12 मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात मोठ्या युद्धाची भीती व्यक्त केली जा आहे. इस्रायलच्या सीमेनजीक राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत आहे. लेबनॉन-इस्रायल सीमेपासून 50 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेले हाइफा विद्यापीठ कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करू इच्छित नाही. विद्यापीठाने स्वत:च्या 30 मजली इमारतीत 5 व्या मजल्यापेक्षा वरच्या भागात काम करणाऱ्या लोकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. ही इमारत हिजबुल्लाहच्या निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2006 मधील हिजबुल्लासोबतच्या युद्धादरम्यान त्याची क्षेपणास्त्रs हाइफापर्यंत पोहोचली होती.  इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने अत्यंत क्रूर हल्ला केला होता. तर 8 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि लेबनॉनमधील सीमेवर संघर्ष वाढला आहे. हमाससोबत एकजुटता दर्शविण्यासाठी हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रs डागली आहेत. इस्रायलने प्रत्युत्तरादाखल दक्षिण लेबनॉन आणि त्यापुढील भागात हवाई हल्ले केले आहेत. ऑक्टोबरपर्यंत या कारवाईमुळे लेबनॉनमध्ये 450 हून अधिक जण मारले गेले आहेत.

इस्रायलकडून मोठी कारवाई शक्य

इस्रायलच्या गोलन टेकड्यांवर शनिवारी झालेल्या हल्ल्यात हात नसल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. परंतु इस्रायलने हिजबुल्लाचा हा दावा फेटाळला आहे. हिजबुल्लाला आत इस्रायलच्या मोठ्या हल्ल्याची भीती सतावू लागली आहे. याचमुळे दक्षिण लेबनॉनमधील अनेक भाग रिकामी करण्यात आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी प्रत्युत्तराचा इशारा देत हिजबुल्लाला याची किंमत फेडावी लागणार असल्याचे म्हटले आहे. हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाहला स्वत:च्या जीवाद्वारे याची किंमत द्यावी लागणार असल्याचे इस्रायलचे विदेशमंत्री काट्ज यांनी म्हटले आहे.

दोन आघाड्यांवर युद्ध?

लेबनॉनसोबत युद्ध केल्यास मोठी हानी होऊ शकते याची जाणीव इस्रायलला आहे. हिजबुल्लाकडे दीड लाख रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रs असल्याचे मानले जाते. याचबरोबर मध्यपूर्वेत इराणचा या संघटनेला असलेला पाठिंबा सर्वज्ञात आहे. अशास्थितीत हिजबुल्लावरील हल्ल्यामुळे इराण देखील या संघर्षात थेट उडी घेऊ शकतो. इस्रायलचे सैनिक अद्याप गाझामध्ये आहेत. यामुळे इस्रायलला दोन आघाड्यांवर एकाचवेळी लढाई करण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article