For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द रिंग्ज ऑफ पॉवर 3’चा टीझर प्रदर्शित

06:34 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘द रिंग्ज ऑफ पॉवर 3’चा टीझर प्रदर्शित
Advertisement

सॅन दिएगो कॉमिक-कॉन 2026मध्ये प्राइम व्हिडिओने ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज :द रिंग्ज ऑफ पॉवर’ सीझन 3 चा टीझर ट्रेलर जारी केला आहे. या प्रीह्यूत सीरिजमधील एक इंटेंस अन् डार्क युगाची झलक दिसून येते, ज्यात मिडिल-अर्थमध्ये सॉरॉनचा उदय, ‘वन रिंग’ची निर्मिती अन् फैलावणारे युद्ध नव्या सीझनची कहाणी पुढे नेणार आहे.

Advertisement

या फुटेजला बेंजामीन वॉकरच्या मॉडरेट करण्यात एका पॅनेलदरम्यान दाखविण्यात आले, ज्यात सिंथिया अडाई-रॉबिन्सन, ओवेन आर्थर, इस्माइल क्रूज कॉर्डोवा, चार्ली विकर्स, डॅनियल वेमॅन अन् नवा कलाकार जेमी कॅम्पबेल बॉवर चर्चेत सामील झाला.

ट्रेलरमध्ये ‘मिडल-अर्थ’चे एक अधिक कठोर चित्र दाखविण्यात आले असून त्यात सॉरॉनची शक्ती फैलावत असून तो तेथील राज्य लढाईची तयारी करत आहे. सीझन 3 चा प्रीमियर 11 नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर होणार आहे, ज्यात पहिले चार एपिसोड्स एकाचवेळी प्रदर्शित केले जातील, यानंतर 18 नोव्हेंबर रोजी 5 वा अन् 6 वा एपिसोड तर 25 नोव्हेंबर रोजी अखेरचे दोन एपिसोड्स प्रदर्शित केले जाणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.