For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदोष मतदारयादीमुळे मतदानाचा हक्क हुकला

10:28 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदोष मतदारयादीमुळे मतदानाचा हक्क हुकला
Advertisement

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : सदाशिवनगर येथील प्रकार

Advertisement

बेळगाव : सदोष मतदारयाद्यांमुळे मंगळवारी अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. मतदारयादीत नाव एकाचे तर फोटो एकाचा असल्यामुळे मतदानच रद्द केले आहे. यामुळे अनेक नागरिकांना तासन्तास रांगांमध्ये थांबूनही मतदान न करताच घरी परतावे लागले. यामुळे निवडणूक अधिकारी व नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली. सदाशिवनगर येथील रहिवासी प्रा. के. डी. मंत्रेशी हे मागील 18 वर्षांपासून  मतदानाचा हक्क बजावतात. मंगळवारी सकाळी सदाशिवनगर येथील मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांनी आपले नाव यादीमध्ये तपासले. परंतु नाव कुठेच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी मतदान यादी चाळून पाहिली असता त्यांच्या फोटो पुढे एका महिलेचे नाव दिसून आले. याबाबत त्यांनी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु मतदार यादीतील हे नाव त्यांना न विचारताच रद्द करण्यात आल्याने त्यांचा राग अनावर झाला.  तब्बल दोन तास थांबूनदेखील सदोष मतदार यादीमुळे मंत्रेशी यांना मतदान न करताच घरी जावे लागले. याप्रमाणेच इतर नागरिकांनाही सदोष मतदारयादीचा फटका बसला. मागीलवेळी एका विभागात तर यावेळी दुसऱ्या विभागात मतदान केंद्र देण्यात आले होते.

यावर्षीच्याच यादीत नाव कसे चुकले?

मतदान करण्यासाठी मंगळवारी सकाळी सदाशिवनगर येथील मतदान केंद्रावर गेल्यानंतर यादीमध्ये नाव नसल्याचे सांगण्यात आले. वयाच्या 75 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर दोन तास घालूनदेखील मतदान न करताच माघारी फिरावे लागले. मागील विधानसभा निवडणुकीपर्यंत नाव असताना यावर्षीच्याच यादीत नाव कसे चुकले? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अधिकारीही अनुत्तरित झाले.

-प्रा. के. डी. मंत्रेशी 

Advertisement
Advertisement
Tags :

.