For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

66 वर्षांपासून रेस्टॉरंटने बदलले नाही तेल

06:22 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
66 वर्षांपासून रेस्टॉरंटने बदलले नाही तेल
Advertisement

चवीचे हेच सिक्रेट असल्याचा दावा

Advertisement

जपानच्या शिजुओकामध्ये फ्राइड चिकन रेस्टॉरंट वाकाटोरीने स्वत:च्या यशाचे रहस्य फ्राय करण्यात येणाऱ्या तेलात दडलेले असल्याचा दावा केला आहे. कंपनीने हे तेल 66 वर्षांपासून बदललेले नाही. या रेस्टॉरंटला जपान फ्राइड ग्रँड प्रिक्समध्ये गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे.

रेस्टॉरंटच्या यशाचे रहस्य एक सिक्रेट सामग्रीत लपलेले आहे. याचा वापर 66 वर्षांपूर्वी रेस्टारँट सुरू झाल्यापासून सातत्याने केला जात असल्याचे वाकाटोरीच्या मालकाने एका मुलाखतीत सांगितले आहे. 1960 मध्ये रेस्टॉरंटच्या स्थापनेपासून तळण्यासाठीचे तेल कधीच पूर्णपणे फेकण्यात आलेले नाही, वाकाटोरीच्या तिसऱ्या पिढीचे मालक योशिहिरो त्सुचिका यांनी दशकांपासून पुनर्वापर करण्यात येणारे तेलच आमच्या परिवाराच्या स्वादिष्ट फ्राइड चिकनचे रहस्य असल्याचे खुल्या स्वरुपात मान्य केले आहे.

Advertisement

‘जुन्या तेला’मुळे वाकाटोरी फ्राइड चिकनमध्ये एक असा ‘सुगंध’ आणि ‘अजोड चव’ येते, ज्याला नव्या तेलाद्वारे प्राप्त करता येऊ शकत नाही, याचमुळे रेस्टॉरंटला प्रतिस्पर्धेत आघाडी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एकाच तेलाचा होतोय वापर

त्सुचिया यांच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. वाकाटोरी 66 वर्षे जुन्या तेलात चिकन तळून लोकांचा जीव जोखिमीत आणत असल्याचा दावा अनेक लोकांनी केला आहे. परंतु जपानच्या या पुरस्कार विजेत्या रेस्टॉरंटने तेलाच्या गुणवत्तेला दैनिक सफाई आणि नवे तेल टाकण्याच्या माध्यमातून कायम ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. दररात्री रेस्टॉरंटचे कर्मचारी तेलातून मांसाचे तुकडे आणि अशुद्धी सावधपणे चाळून वेगळे करतात. केवळ काही प्रमाणात जुन्या तेलाच्या स्वादाच्या आधारावर ठेवले जाते आणि त्याला तळण्यासाठी नव्या तेलात मिसळले जाते. याचमुळे आपण 66 वर्षे जुन्या तेलाचा हुबेहुब वापर करत नाही, परंतु तांत्रिक स्वरुपात त्या जुना तेलाचे अणू अद्याप वाकाटोरीच्या तेल मिश्रणात असू शकतात.

जुन्या तळलेल्या तेलाला वाचवून आणि त्यात नवे तेल मिसळून वाकाटोरी मूळ रुपात तेच तंत्रज्ञान अवलंबित आहे, जे काही रेस्टॉरंट स्वत:च्या सूपसाठी वापरतात. सर्वात जुने ओडेन सूप टोकियो, जपानचे एक प्रसिद्ध रेस्टॉरंट ओटाफुकुमध्ये वापरण्यात येते. हे रेस्टॉरंट 70 वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्याच सूपचा वापर करत आहे. अशाचप्रकारे बँकॉकच्या एक्कामाई भागातील एक रेस्टॉरंट 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्याच प्रकारचे सूप सर्व करत आहे.

तज्ञांचा इशारा

तेल आणि शोरबा एक समान नसतात, कारण वारंवार तळल्याने ट्रान्स फॅटी अॅसिड आणि एक्रिलामाइड यासारखे हानिकारक आणि कॅन्सरयुक्त पदार्थ निर्माण होतात. तसेच प्रतिदिन नव्या तेलाने ते पातळ केल्यावरही या हानिकारक पदार्थांना पूर्णपणे रोखले जाऊ शकत नसल्याचा इशारा खाद्यतज्ञ देत आहेत.

Advertisement
Tags :

.