For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2000 ची नोट चलनातून हद्दपार ? आरबीआयचा मोठा निर्णय

08:01 PM May 19, 2023 IST | Abhijeet Khandekar
2000 ची नोट चलनातून हद्दपार   आरबीआयचा मोठा निर्णय
Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी चलनातून ₹2,000 च्या नोटा चलनातून बाद केल्या. तरीही ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरूच असल्या तरीही आरबीआयने बँकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ₹२,००० च्या नोटां जमा करून घेण्याची सुविधा उपल्बध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. आपला निर्णय जाहीर करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे कारण देत २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

Advertisement

मोदी सरकारने 500 आणि 1,000 रुपय़ांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2,000 रुपय़े असलेल्या मूल्याची बँक नोट चलनात आली. RBI ने 2018- 2019 मध्ये 2,000 च्या नोटांची छपाई थांबवली होती. तसेच, मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आलेल्या 2,000 रुपयाच्या मूल्याच्या नोटांपैकी सुमारे 89 टक्के नोटा या 4 ते 5 वर्षांच्या आयुर्मानातील आहेत असे म्हटले आहे.

RBI च्या दाव्यानुसार 2,000 रुपयाच्या नोटा सामान्यतः व्यवहारांसाठी वापरले जात नसून इतर मूल्यांच्या नोटांचा साठा लोकांच्या चलनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. असे म्हटले आहे. आरबीआय बँकेच्या ‘क्लीन नोट पॉलिसी’नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. लोक 2000 च्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतील किंवा इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत त्या बदलून घेऊ शकतील. 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 च्या नोटां जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची मर्यादा 20,000 पर्यंत केली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.