महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समुद्रातून बाहेर काढणार जहाजाचे अवशेष

06:22 AM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमूल्य खजिना हाती लागणार

Advertisement

पाचव्या शतकातील ग्रीक जहाजाचय अवशेषांना समुद्राच्या तळावरून हस्तगत करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या अवशेषातून प्राचीन सोन्याचा शोध घेतला जाणार आहे. गेला द्वितीयचे अवशेष हे सिसिलीच्या गेला बंदरानजीक शोधण्यात आले आहेत. या ठिकाणी भूतकाळात अनेक महत्त्वाच्या कलाकृतींचा शोध लागला आहे. जहाजाचे अवशेष बाहेर काढण्यास सुमारे 270 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे मानले जात आहे. यात सामील कंपन्यांना सुमारे 4.25 लाख पाउंडचा खर्च येणार आहे.

Advertisement

गेला द्वितीयच्या अवशेषांना अमूल्य मानले जात आहे. गेला प्रथम या जहाजाचे अवशेष देखील या क्षेत्रात मिळाले आहेत. याचा अर्थ गेला द्वितीय सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाच्या यशाला दुप्पट करणार आहे. गेला द्वितीयचे पहिले संरक्षण बोस्को लिटोरियाच्या एका संग्रहालयात होणार आहे. संग्रहालय अविश्वसनीय हस्तगत सामग्री आणि कलाकृतींना संरक्षित करणार आहे.

1995 मध्ये सुरू झाला शोध

गेला द्वितीच्या शोधाच्या 5 वर्षांनी 1995 मध्ये याची प्रारंभिक तपासणी सुरू झाली होती. पुरातत्व तज्ञांना कोरिथियन हेलमेट आणि ओरिचलकम सिल्लिया यासारख्या अमूल्य वस्तू मिळाल्या. ओरिचलकमला पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा मूल्यवान धातू मानले जाते. प्राचीन काळात प्लेटोसारख्या लोकांनी याचा उल्लेख केला आहे. आता या कलाकृती गेलाच्या पुरातत्व संग्रहालयाच्या स्थायी संग्रहाचा हिस्सा आहेत. कारण गेला द्वितीयचे नवे अविश्वसनीय उत्खनन सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केले जात आहे.

गेला द्वितीयच्या उत्खननाचा पहिला टप्पा जुलैमध्ये सुरू झाला होता, ज्यात जहाजाची लांबी सुमारे 15 मीटर आणि रुंदी 5 मीटर होती. गेला द्वितीयला देखील जवळपास 6 मीटर पाण्याखाली शोधण्यात आले होते. पुढील काही दिवसांमध्ये जहाज तोडून वर आणले जाणार आहे. मग पार्को आर्कियोलॉजिको डि गेलाच्या आत बोस्को लिटोरियाच्या प्रयोगशाळांमध्ये ते बहाल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. गेला द्वितीय म्युजियो डेले नवी डि गेलामध्ये एक केंद्रीय तुकडा असणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article