For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अथक युक्रेन युद्ध आणि वाटाघाटी

06:24 AM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
अथक युक्रेन युद्ध आणि वाटाघाटी
Advertisement

जवळपास साडेचार वर्ष चाललेले रशिया-युव्रेन युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून नव्याने प्रयत्न सुऊ झाले आहेत. इराण युद्ध अनिर्णित अवस्थेत असताना, रशिया-युव्रेन युद्ध पाचव्या वर्षाकडे जात असताना, ट्रम्प सरकारची घसरती प्रतिमा सावरण्याचा कसोशीचा प्रयत्न म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे.

Advertisement

प्रथेनुसार नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत दोन वर्षानंतरच्या मध्यावधी निवडणूका येऊ घातल्या आहेत. युव्रेन युद्धाबाबत अमेरिकेची आतापर्यंत फोल ठरलेली मध्यस्थी आणि ओढवून घेतलेले इराण युद्ध, यामुळे ट्रम्प प्रशासन देशांतर्गत प्रचंड अप्रिय ठरले आहे. अशा स्थितीत, निवडणूकीत जर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सभागृहातील बहुमत गमावले, तर राष्ट्राध्यक्षांना आपली धोरणे पुढे नेणे अत्यंत कठीण बनेल. तथापि दीर्घकाळ चाललेल्या युव्रेन युद्धाबाबत, शांतता कराराच्या दिशेने काही सकारात्मक घडल्यास ट्रम्प यांना निवडणूकीपूर्वी मोठा दिलासा मिळू शकतो. दुसरीकडे सामंजस्य कराराच्या मोडतोडीमुळे इराण युद्धावरचा तोडगा अद्यापही दृष्टीपथात नसल्याचेही युव्रेन प्राधान्यक्रमामुळे स्पष्ट होते.

विटकॉफ व कुशनर जोडगोळी

Advertisement

युव्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी, स्टीव्ह विटकॉफ आणि जरेड कुशनर या आपल्या विश्वासू सल्लागार आणि राजदूतांना विशेष जबाबदारी दिली आहे. हे दोघे पूर्वाश्र्रमीचे व्यावसायिक भागीदारही राहिले आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून, यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक संवेदनशील मुद्यांवरील, उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये उभयतांचा सहभाग राहिला आहे. अलीकडेच हमास आणि इस्त्रायल युद्धविराम करार, इराण-अमेरिका सामंजस्य करार याबाबतच्या राजनैतिक चर्चांमध्ये दोघेही सहभागी होते. 2020 च्या अरब-इस्त्रायल अब्राहम करारातही त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. युव्रेन युद्धाच्या संदर्भात सांगायचे तर, ट्रम्प यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुऊ केल्यापासून विटकॉफ आणि कुशनरनी अनेकदा मास्को दौरे केले आहेत. यांच्या दौऱ्यात यावेळी युव्रेनची राजधानी किवचा सहभाग प्रथमच होता. उभयतांच्या या पुतीन पसंतीमुळे कांही निरीक्षकांना अशी भीती वाटते की, ते रशियाच्या बाजूने झुकलेल्या करारास पाठिंबा देऊ शकतात.

इराण युद्धामुळे त्रिपक्षीय वाटाघाटी प्रक्रियेचा बराच काळ वाया गेल्यानंतर, गेल्या शनिवारी विटकॉफ आणि कुशनर यांनी, मास्कोत पुतीन यांच्याशी चर्चा केली आणि रविवारी किव येथे ते युव्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की व त्यांच्या अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करण्यास गेले. त्यांच्या विदेशागमनापूर्वी ट्रम्प यांनी हे दोघे राजदूत, युव्रेन युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव घेऊन निघाले आहेत, असे पत्रकारांना सांगितले. मात्र युव्रेन शांतता योजनेचा नवीनतम तपशील न सांगता, आमच्याकडे शांततेसाठी एक कल्पना आहे इतकेच ते म्हणाले.

ट्रम्प यांचे यापूर्वीचे प्रयत्न

जानेवारी 2025 मध्ये दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यापासून, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, रशिया-युव्रेन शांतता करार घडवून आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. मार्च 2025 मध्ये, त्यांनी युव्रेनला मिळणारी अमेरिकेची मदत थांबवली व रशियासोबत युद्ध संपवण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये सहभागी होण्याकरिता झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढवला. मे 2025 मध्ये प्रथमच युव्रेनियन आणि रशियन मुत्सद्यात थेट शांतता चर्चा झाली, दरम्यान या संघर्षातील सर्वात मोठी कैद्यांची अदलाबदल शक्मय झाली. दोन्ही प्रतिनिधी मंडळे दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकत्र आली, परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. पुन्हा ऑगस्ट 2025 मध्ये युव्रेन युद्ध संपवण्यावर चर्चा करण्यासाठी ट्रम्प आणि पुतीन अलास्कामध्ये भेटले. परंतु युद्ध संपवण्याचा करार या शिखर परिषदेत होऊ शकला नाही. त्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये ट्रम्पनी वॉशिंग्टन आणि मास्कोने तयार केलेला 28 कलमी प्रस्ताव सादर केला. त्यात युव्रेनने आपला प्रदेश सोडून द्यावा, नाटोमध्ये प्रवेशबंदी असे मुद्दे होते. तसेच या प्रस्तावानुसार रशियावरील निर्बंध उठवण्यात आले आणि त्याला जी-7 व जी-8 गटात पुन्हा स्थान देण्यात आले. युव्रेनने हा प्रस्ताव एकतर्फी म्हणत नाकारला. यानंतर युव्रेनने अमेरिकेसह एक सुधारित 20 कलमी योजना तयार केली. या योजनेवर ट्रम्प-झेलेन्स्की यांची चर्चाही झाली. तथापि, पुतीन आणि त्यांच्या सहाय्यकांनी, सदर करारातील, युरोपीय शांतता सैनिकांच्या युव्रेनमधील तैनातीसह, अनेक मुद्यांना आक्षेप घेत 20 कलमी योजना फेटाळली.

आताची मध्यस्थी आणि फलीत

विटकॉफ आणि कुशनर यांच्याशी वाटाघाटी करण्यापूर्वी, आठवडाभर आधी पुतीन शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी किर्गिस्तानला गेले होते. तेथे पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, ‘आज जगातील राष्ट्रे डार्विनच्या ‘जो बलवान तोच टिकेल’ या सिद्धांतानुसार चालणाऱ्या स्पर्धेत अस्तित्वात आहेत. या तत्वाच्या लढाईत रशियाच विजयी होईल.’ देशांतर्गत जनतेसाठी आणि पुतीन यांच्या आंतरराष्ट्रीय समकक्षांसाठी याचा अर्थ स्पष्ट होता. युव्रेन युद्धाच्या बाबतीत रणांगणावर सीमारेषा कुठेही असल्या किंवा युव्रेनने खोलवर हल्यांच्या मोहिमेद्वारे सामान्य रशियन नागरिकांना कितीही त्रास दिला, तरी पुतीन अंतिम विजयापर्यंत लढत राहतील.

अमेरिकन राजदूतांच्या सोबत झालेल्या चर्चेत, पुतीन आपल्या पूर्वीच्याच मागण्यांवर ठाम होते. आतापर्यंतच्या युद्धानंतर युव्रेनच्या अंशत: ताब्यात असलेल्या डोन्सेक, लुहान्स्क, खेरसॉन आणि झापोरिझिया या चार प्रदेशांचे रशियात विलिनीकरण मान्य व्हावे, युक्रेनवर सैन्य व शस्त्रांची मर्यादा आणि तेथे युरोपीय शांतता सैनिकांच्या उपस्थितीस मनाई, या त्यांच्या मागण्या केवळ युव्रेनच नाही, तर युनो आणि आंतरराष्ट्रीय समुदायासही अमान्य आहेत. तीन तासांच्या या चर्चेत रशियन बाजूने, युव्रेन आघाडीवरील लष्करी परिस्थिती आपणांस अनुकूल असल्याचे भासवले. चर्चेदरम्यान अमेरिका-रशिया आर्थिक सहकार्याच्या संभाव्य प्रकल्पांवरही बोलणी झाली. अमेरिकन बाजूने या बैठकीत युद्ध कसे संपवायचे, यावर दोन्हीकडून नवीन कल्पना पुढे आल्याचे स्पष्ट केले.युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वाटाघाटीत, अमेरिकन राजदूतांना रशियाच्या नेमकी उलट कहाणी ऐकण्यास मिळाली. युव्रेनियन अधिकाऱ्यांनी दावा केला की, ऑगस्टमध्ये गमावलेल्या प्रदेशापेक्षा अधिक प्रदेश त्यांनी मिळवला व रशियाचे 42 हजार सैनिक त्यांच्या मोहिमेत ठार किंवा जखमी झाले. चर्चेत झेलेन्स्कींनी सातत्याने यावर जोर दिला की, कोणत्याही करारासाठी, युव्रेनला सुरक्षा हमी देणे आवश्यक असेल, ज्यात युद्धोत्तर पुनर्बांधणीसाठीच्या समर्थनाचाही आवर्जुन समावेश असावा. एकंदरीत, पुढील त्रिपक्षीय चर्चेस पुतीन व झेलेन्स्की यांनी सकारात्मकता दर्शविली असली, तरी लवकर युद्धविराम होऊ शकतो अशी कोणतीही चिन्हे वाटाघाटीतून दिसली नाहीत. दिसले असे की, आगामी निवडणूकीपूर्वी, शांतता चर्चेत प्रगती झाल्याचा देखावा निर्माण करण्याच्या ट्रम्प यांच्या इच्छेचा, तसेच ट्रम्प यांच्या व्यावसायिक भागीदारांना फायदेशीर सौद्यांमध्ये असलेल्या स्वारस्याचा फायदा उचलण्यावर रशियाचे डावपेच केंद्रीत आहेत.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.