For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘केरळा स्टोरी-2’ च्या प्रदर्शनाला स्थगिती

06:39 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘केरळा स्टोरी 2’ च्या प्रदर्शनाला स्थगिती
Advertisement

केरळ उच्च न्यायालयाचे सेन्सॉर बोर्डावर कठोर मत

Advertisement

वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम

‘केरळा स्टोरी-2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर केरळ उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने स्थगिती दिली आहे. न्या. बेचू कुरियन थॉमस यांनी ही स्थगिती दिली. त्यांनी सेन्सॉर बोर्डावर या चित्रपटाला अनुमती देण्यासाठी ताशेरेही ओढले आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला अनुमती देताना पायाभूत नियमांचा विचार केला नाही, असे मतप्रदर्शन त्यांनी केले आहे. या निर्णयाविरोधात या चित्रपटच्या निर्मात्यांनी उच्च न्यायालयाच्या बहुसदस्यीय पीठाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला असून तशी याचिकाही सादर केली आहे. तिच्यावर निर्णय आता अपेक्षित आहे.

Advertisement

हा चित्रपट आज शुक्रवारी (27 फेब्रुवारी) प्रशर्शित होणार होता. तथापि, आता  हे प्रदर्शन लांबणीवर पडणार आहे. केरळ उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठासमोर आता त्याच्या संदर्भात सुनावणी होईल. ही सुनावणी त्वरित करण्यात यावी, अशी विनंती चित्रपटाच्या निर्मात्यांकडून न्यायालयाकडे करण्यात आली.

कामाख्या नारायण सिंग यांचे दिग्दर्शन

हा चित्रपट कामाख्या नारायण सिंग यांनी दिग्दर्शित केलेला असून त्याची निर्मिती विपुल अमृतलाल शहा यांनी केली आहे. केरळमध्ये हिंदू तरुणींना आंतरधर्मिय विवाह करण्याच्या जाळ्यात कसे ओढले जाते आणि असे विवाह झाल्यानंतर त्यांचे कसे शोषण केले जाते, त्यांच्या अधिकारांपासून त्यांना कसे वंचित केले जाते आणि त्यांना कसे मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडण्यात येते, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून तो न्यायालयात गेला.

बुधवारी झाली सुनावणी

केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटासंबंधी बुधवारी सुनावणी करण्यात आली. चित्रपट निर्मात्याच्या चिंता खऱ्या असू शकतात, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. या चित्रपटामुळे केरळ राज्याची अवमानना होत आहे, असा आक्षेप घेत एका व्यक्तीने चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. आता उच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्र सरकार, सूचना आणि प्रसारण विभाग, केंद्रीय चित्रपट मान्यता मंडळ इत्यादींना नोटीसा लागू केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.