दृश्यम 3 चित्रपटाचा प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
दृश्यम 3 हा चित्रपट चालू वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दोन यशस्वी भागांनंतर निर्माते आता तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. अजय देवगणचा हा चित्रपट मल्याळी अभिनेता मोहनलालच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अजय देवगणचा दृश्यम 3 हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर आता मल्याळी भाषेतील दृश्यम 3 चा दिग्दर्शक जीतू जोसेफने देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
दृश्यम या चित्रपटाने अनेक लोकांना प्रभावित केले आहे. दृश्यम 3 हा चित्रपट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचे जोसेफ यांनी स्पष्ट पेले आहे. निर्माते दृश्यम 3 चे हिंदी आणि मल्याळी वर्जन एकत्रित प्रदर्शित करण्याची योजना आखत होते, दोन्ही चित्रपटांचे चित्रिकरणही जवळपास एकाचवेळी होणार होते, परंतु काही मतभेदांमुळे निर्मात्यांनी हे चित्रपट वेगवेगळ्या दिवशी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दृश्यम 3 चित्रपटात जॉर्जकुट्टी नाईलाजापोटी केलेल्या गुन्ह्यानंतर स्वत:च्या परिवाराच्या रक्षणासाठी अनेक प्रयत्न करताना दिसून येणार आहे. मोहनलाल यांच्यासोबत या सस्पेंस थ्रिलरमध्ये मीना, अनसिबा हसन, एस्थर अनिल, आशा शरथ यासारखे अनेक कलाकार दिसून येणार आहेत.