कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संतन की बादशाही

04:25 PM Jun 27, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सासवड / ह.भ.प. अभय जगताप :

Advertisement

ठाडे बिटपर निकट कटिपर कर पीतांबर धारी।
शंख चक्र दो हात बिराजे गोवर्धन गिरिधारी ।।
मदन मुरत खुब सुरत बनी हे नटनागर ब्रजवासी।
अतसीकुसुमसम कांति बिराजत मोर मुगुट गला तुलशी ।।
भीमाके तट निकट पंढरपूर अजब छत्र सुखदाई ।
टाल बिना और मृदंग बजावत संतनकी बादशाही ।।
भजन पूजन हरिकीर्तन निशिदिनी गावत हरिलीला।
प्रेमसुखकू लंपट बैठकर पुंडलीक मतवाला ।।
छोड दिया बैकुंठसुख हरी भाव भगतका भूका।
कहत कबीर हरीसे मीठा लागत तुलशी बुका ।।

Advertisement

संत कबीरांचे दोहे आपण ऐकलेले असतात. पण त्यांनी अभंग सदृश्य पदे रचली आहेत, याची अनेकांना कल्पना नसते. कबीर हे वारकरी संप्रदायाला स्वीकृत असे उत्तर भारतीय संत आहेत. अभ्यासक कबीरांचा काळ जनाबाईंच्यानंतर मानत असले तरी त्यांच्या अभंगात कबीरांचा उल्लेख आहे. ‘कबीर मोमीन लतीफा मुसलमान’ असा त्यांचा उल्लेख तुकोबांच्या अभंगात आहे. वारकरी सांप्रदायिक आख्यायिकेनुसार कबीर पंढरपूरला आले होते. त्यांनी नामदेवरायांचे कीर्तनही ऐकले होते. तर अशा या कबीरांचा विठ्ठल वर्णन करणारा हा अभंग आहे. ते म्हणतात, या देवाने पितांबर धारण केला आहे. कमरेवर हात ठेवून तो विटेवर उभा आहे. दोन हातांमध्ये शंखचक्र आहेत. हाच गोवर्धन पर्वत उचलणारा कृष्ण आहे. मदनासमान याची मूर्ती सुंदर आहे. अलसी नावाच्या निळ्या फुलाप्रमाणे याचा वर्ण आहे. मोरपिसांचा मुगुट व गळ्यात तुळशीचा हार आहे. कबीर आणि पंढरीचे वर्णन करताना भीमा नदीचाही उल्लेख केला आहे.

पंढरपुरामध्ये जेव्हा सर्व संत भक्त मंडळी टाळ, विणा, मृदंगाच्या गजरात भजन करतात. या भजनाने सर्व वातावरण भारावून जाते. भजनात रमलेली सर्व संत भक्त मंडळी बघून कबीर म्हणतात की जणू काही इथे ‘संतांची बादशाही’ अवतरली आहे. नामदेवरायांनी सुद्धा एके ठिकाणी ‘विठोबाचे राज्य’ असा उल्लेख केला आहे.

संतांच्या या बादशहाला भजन, पूजन, कीर्तन आवडते. तो प्रेम सुखाचा लंपट असून पुंडलिकासाठी येथे आला आहे. हा देव भावभक्तीचा भुकेला असून त्यासाठीच वैकुंठ सोडून तो पंढरपूरला आला आहे. याच्या आवडीची अजून एक गोष्ट म्हणजे तुळशी आणि बुक्का. बुक्क्याचा गंध आणि तुळशी माळ म्हणजे वारक्रयांची महत्त्वाची बाह्यखूण आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article