For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुबाबदार ‘कोल्हापुरी’ आरोग्यासही फायदेशीर

01:49 PM Jul 05, 2025 IST | Radhika Patil
रुबाबदार ‘कोल्हापुरी’ आरोग्यासही फायदेशीर
Advertisement

कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :

Advertisement

कोल्हापूरी चप्पल जसे रूबाबदार आहे तसे त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. हे फक्त एक पारंपारिक पादत्राण नाही, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही लाभदायी आहे. नैसर्गिक साहित्य आणि चामडे यांचा वापर करून बनवलेली ही चपला जशी तिच्या ऊतब्यामूळे प्रसिध्द आहे तसे या चप्पलचे आरोग्यदायी फायदेही आहेत. या चप्पलने आरोग्याच्या समस्यांचा प्रश्नही सोडवला आहे.

कोल्हापूरच्या अनेक वस्तू जगभर प्रसिध्द आहेत अगदी कोल्हापूरी भाषा सूध्दा लगेच ओळखली जाते त्याचप्रमाणे कोल्हापूरी चप्पलही जगभर प्रसिध्द आहे. गेल्या आठवड्यात इटालियन लक्झरी फॅशन ब्रँन्ड प्राडाने कोल्हापूरी चप्पलशी साम्य असणाऱ्या चप्पलचे सादरीकरण केल्याने कोल्हापूरी चप्पल पून्हा एकदा चर्चेत आले आहे. प्राडा एकप्रकारे कोल्हापूरी चप्पलचा ब्रँड चोरल्याचा आरोप कोल्हापूरातून होत आहे. मात्र कोणी कितीही साधर्म्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी कोल्हापूरी कारागीराप्रमाणे कोल्हापूरी चप्पल बनवू शकणार नाही. हे तितकेच खरे आहे.

Advertisement

  • नैसर्गिक थंडाव्याने दिलासा

कोल्हापूरी चप्पल जनावरांच्या कातड्यापासून तयार केली जाते. कोल्हापूरी चप्पल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व घटक नैसर्गिक असतात. त्यामध्ये कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अजिबात वापर नसतो. त्यामूळे त्या चप्पल पायाच्या त्वचेला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत. विशेषत: उन्हाळ्यात कोल्हापूरी चप्पल घातल्यास पायांना थंडावा मिळतो आणि पायातील घाम पटकन शोषला जातो. यामूळे पायांमध्ये दुर्गंधी, घामोळे किंवा इतर त्वचेची समस्या निर्माण होत नाही.

  • पायांना मिळतो ‘मसाज’

कोल्हापूरी चप्पलचा तळवा थोडा मजबूत आणि पायाला मूलायम असतो. त्यामूळे चालताना पायाच्या तळव्यावर हलकासा दाब निर्माण होतो. हा दाब शरीरातील रक्तभिसरणासाठी फायदेशीर ठरतो. पायातील थकवा दूर होतो व चालताना पायाला हलकासा मसाज मिळाल्याचा अनूभव येतो. विशेषत: ज्यांना पाय दूखणे, अंगदुखी किंवा थकवा जाणवतो, त्यांच्यासाठी कोल्हापुरी चप्पल उत्तम पर्याय आहे.

  • पायताण म्हणजे काय ?

कोल्हापुरी चप्पलास पायताण असे काही जण म्हणतात. उन्हाळ्यात पायापासून डोक्यापर्यंत सर्व शरीर थंड ठेवणारे, ताण कमी करणारे चप्पल म्हणजेच पायताण होय. त्यामूळे कोल्हापूरी चप्पल जशी कोल्हापूरीची सांस्कृतिक ओळख आहे. तसेच त्याचे आरोग्यदायी महत्वही आहे.
                                                                                                   -अनिल डोईफोडे, चप्पल व्यावसायिक, कोल्हापूर

चप्पल बनवताना चामड्याचे टॅनिंगची पध्दत वापरली जाते. ज्यामध्ये कोणतेही हानिकारक रसायन नसते. या नैसर्गिक आणि हस्तकौशल्य यूक्त प्रक्रियेमूळे जल प्रदूषण किंवा पर्यावरणास हानी पोहचत नाही. आणि चामड्यामूळे मानवी शरीरासाठीही लाभदायकच आहे.
या चप्पलांचा खास गूण म्हणजे काही दिवस वापरल्यानंतर त्या तूमच्या पायांच्या आराखड्यानूसार आपोआप बसतात. शिवाय, कातडं वापरल्यामूळे त्याचे लोचटपण वाढत आणि अधिक आरामदायक होतात. यामूळे दीर्घकाळ वापरल्या तरीही पायात कोणतीही जळजळ किंवा वेदना जाणवत नाहीत. त्यामूळे शरीराच्या आरोग्याची काळजी एकत्रित जपायची असेल, तर कोल्हापुरी चप्पल घालणे ही काळाची गरज आहे.

Advertisement
Tags :

.