महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस स्थानकात बदलण्यात आल्या नोंदी

06:26 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता बलात्कार प्रकरण : सीबीआयचा पोलिसांवर गंभीर आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयने न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. याप्रकरणही संबंधित अनेक खोट्या नोंदी पोलीस स्थानकात तयार करण्यात आल्या आणि बदलण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. ताला पोलीस स्थानक प्रभारी अभिजीत मंडल आणि माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या चौकशीदरम्यान हा खुलासा झाला आहे. याच आधारावर या दोन्ही आरोपींची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे सीबीआयने म्हटले. यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्कचा डाटा मिळविण्यासाठी कोलकाता सीएफएसएलकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित डाटा आणि अहवालाच्या आधारावर आरोपींची अजून चौकशी करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही आरोपींच्या मोबाइल फोनमधील डाटा मिळविण्यासाठी ते सीएफएसएल येथे पाठविण्यात आले आहेत. या दोन्ही डाटांच्या आधारावर महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयासमोर केला आहे.

याप्रकरणी तपास प्रगतिपथावर आहे. 20 सप्टेंबरच्या आदेशांतर्गत सीएफएसएल, कोलकाता येथील संचालकाला पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टविषयी माहिती देण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी एक तज्ञ पाठविण्याचा निर्देश देण्यात आला होता. परंतु त्याच्या अनुपस्थितीमुळे हे होऊ शकले नाही. याचमुळे या प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी सियालदह येथील न्यायालयात करण्यात आली. या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीत होत आहे.

बलात्कार आणि हत्या प्रकरणी माजी प्राचार्य संदीप घोष आणि पोलीस अधिकारी अभिजीत मंडल यांच्यावर गुन्ह्याशी निगडित पुरावे नष्ट करणे आणि तपासाची दिशा भटकविल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या चौकशीत दोन्ही आरोपी सहकार्य करत नसल्याचे समजते. ताला पोलीस स्थानक, गुन्ह्याचे ठिकाण आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजसोबत दोघांना आमने-सामने बसवून चौकशी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article