कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नुकत्याच सादर झालेल्या एमजी विंडसरला ग्राहकांची पसंती

06:34 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

8,000 पेक्षा अधिकजणांनी केले बुकिंग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ब्रिटीश वाहन निर्मिती कंपनी जेएसडब्ल्यू एमजी मोटर्सने अगदी दोन दिवसांपूर्वी सादर केलेली आपली नवीन जेएसडब्ल्यू एमजी विंडसर प्रो भारतीय बाजारात दाखल केली होती. गाडी सादर करण्यात आल्यानंतर जवळपास 8000 पेक्षा अधिक ग्राहकांनी आतापर्यंत बुकिंग केली आहे. यामध्ये जेएसडब्ल्यू एमजी विंडसर प्रो ईव्हीने आता एक नवीन विक्रम नोंदविला असल्याची माहिती कंपनीनेच स्वत: दिली आहे.

24 तासांमध्ये 8000 बुकिंग

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एमजी विंडसर प्रोईव्ही सादर करण्यात आल्याच्या 24 तासांच्या आतच या कारला जवळपास 8,000 इतके बुकिंग प्राप्त झाले असून यायोगे एक नवा विक्रम प्राप्त केला आहे.

किंमतीत वाढ होण्याची शक्यता

कंपनीकडून एमजी विंडसर प्रो ईव्हीच्या सादरीकरणादरम्यान या संदर्भात माहिती दिली होती. यामध्ये 8000 बुकिंग झाल्यानंतर गाडीच्या किंमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. सुरुवातीची किंमत ही 17.49 लाख रुपये होती, जी वाढवून 18.09 लाख रुपये करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article