रियलमी 16 5जी स्मार्टफोन पुढील महिन्यात होणार लाँच
06:57 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
7 हजार एमएएचची बॅटरी : एआय वैशिष्ट्यो असणार
Advertisement
नवी दिल्ली :
रियलमी कंपनीचा रियलमी 16 5जी हा नवा स्मार्टफोन 2 एप्रिलला भारतीय बाजारात लॉन्च होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरचा स्मार्टफोन हा नव्या डिझाईनसह त्याचप्रमाणे दमदार बॅटरी व उत्तम कॅमेऱ्यासह एआय वैशिष्ट्यासह सादर केला जाणार असल्याचे समजते.
Advertisement
या स्मार्टफोनला जवळपास 7 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. यामध्ये रियर सेल्फी मिरर कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी 16 5जी स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला असून यामध्ये लुमा कलर इमेजिंग तंत्रज्ञानाचा समावेश असणार आहे. यामध्ये फ्रंट कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा दिला गेला असून 6.57 इंचाचा डिस्प्लेही दिला गेला आहे. चार्जिंग करिता 60 डब्ल्यूचा फास्ट चार्जर देण्यात आला असून हा स्मार्टफोन धूळ आणि पाणी रोधक असणार आहे.
Advertisement