महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दुर्मिळ गटाचे रक्तदान करीत ओटवणेतील युवकाची तत्परता

10:38 AM Nov 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अमेय गावडे यांचे ८ वे रक्तदान

Advertisement

ओटवणे |  प्रतिनिधी

Advertisement

पडवे येथील एस. एस. पी. एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या मालवण तालुक्यातील चुनवरे येथील प्रभावती रत्नु जाधव या महिलेला ए बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज असल्याचे समजताच सिंधूरत्न रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि नियमित रक्तदाते अमेय रमेश गावडे (ओटवणे) यांनी या महिलेसाठी तात्काळ पडवे एस एस पी एम रुग्णालयातील रक्तपेढीत जात रक्तदान केले.

या दुर्मिळ रक्तगटाबाबत या महिलेच्या नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे महेश राऊळ यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यानी या दुर्मिळ रक्तगटाचे ओटवणे येथील दाते अमेय गावडे यांच्याशी संपर्क साधला. अमेय गावडे यांचे हे ८ वे रक्तदान असून यापूर्वीही त्यांनी तात्काळ रक्तदान करीत अनेकांचे जीव वाचविले आहेत. या अमूल्य रक्तदानाबद्दल या महिलेच्या नातेवाईकांनी अमेय गावडे यांच्यासह सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# youth #
Next Article