For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेमळे सातेरी पंचायतनचा पुनःप्रतिष्ठापना वर्धापन २३ रोजी

12:25 PM May 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
नेमळे सातेरी पंचायतनचा पुनःप्रतिष्ठापना वर्धापन २३ रोजी
Advertisement

नेमळे : वार्ताहर

Advertisement

नेमळे येथील श्री देवी सातेरी पंचायतनचा पुनः प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा शनिवार दि 23 मे ते रविवार दि 24 मे 2026 या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्ताने श्री देवी सातेरी मंदिरामध्ये चंडीयाग सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यास सर्व भाविकभक्त,देणगीदार,पाहुणे मंडळी,शिमधडे सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याच्या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रम पत्रिका-
शनिवार दि 23 मे -
सकाळी 7ते 11 शांती पाठ, देवतांची प्रार्थना,गणपती पूजन, आचार्य वरण, प्रकार शुद्धी देवता, स्थापना,चंडिपाठ, ग्रहयाग आरती तीर्थप्रसाद,
सायं 6 वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम.
रविवार दि 24 मे -
सकाळी 7 ते 12. 30 -
आवाहीत देवता पूजन,कुंकूमार्चन, चंदीपाठाचे हवन,बलिदान पूर्णाहुती आरती महागाऱ्हाणे,तीर्थप्रसाद,महाप्रसाद
सायं - 6 वा. पासून भजनाचा कार्यक्रम
रात्रौ- 10 वा. जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे नाटक.

Advertisement
Advertisement
Tags :

.