राज्यात आज रथसप्तमी उत्सव
06:20 AM Jan 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/पणजी :
Advertisement
माघ महिन्यातील सर्वात मोठा उत्सव मानल्या गेलेल्या मागील गणपती नंतर आज राज्यात सर्वत्र रथसप्तमी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. आजच्या दिनी सूर्यनमस्कार आणि सूर्यपूजन केले जाते. 14 जानेवारीपासून सुरू झालेल्या मकर संक्रांती उत्सवाची आज समाप्ती होत आहे. आजच्या या पवित्र दिनी आपल्या अंगणातील तुळशी समोर सूर्यपूजा केली जाते आणि सूर्याला व तुळशीला बाजूलाच सूर्याच्या उन्हात शिजवलेल्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो आणि त्याचा प्रसाद भक्षण केला जातो. दरम्यान, हातुर्ली-मये येथे प.पू ब्रह्मानंद स्वामींच्या मठामध्ये आज विशेष उत्सव साजरा केला जाणार आहे. तर राजधानी पणजीमध्ये रथसप्तमीच्या निमित्ताने आज विशेष महापूजा तसेच श्रींची रथातून मिरवणूक काढली जाते.
Advertisement
Advertisement