महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीपीएल चषकाचा रॅपटर्स मानकरी

10:46 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डॉ. दीपा आणि भारती दुहेरीत विजेते

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा शटल बॅडमिंटन आयोजित तिसऱ्या बीपीएल निमंत्रितांच्या साखळी बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत रॅपटर्स संघाने बीडीबीए मास्टर संघाचा पराभव करुन बीपीएल चषक पटकाविला. स्मॅश मास्टर संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर महिलांच्या दुहेरीत डॉ. दिपीका मगदूम व भारती तेंग्गीनकेरी यांनी विजेतेपद पटकाविले. महाबळेश्वरनगर येथील बीडीबीएच्या बॅडमिंटन सभागृहात घेण्यात आलेल्या या साखळी बॅडमिंटन स्पर्धेत जवळपास 11 संघांनी भाग घेतला असून बीपीएल स्टार्स, स्मॅश मास्टर, संकेश्वर रायडर्स, हिताची वॉरियर्स, रॅपटॉर्स, बीडीबीए मास्टर, फेदर फाटर्स, मास्टर ब्लास्टर, रॉयल रायडर्स, शटल स्मॅचर, चिकोडी चिटस आदी संघांनी यामध्ये भाग घेतला असून हे संघ तीन गटात विभागले असून साखळी पद्धतीने सामने खेळविले.

Advertisement

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रॅपटर्स संघाने स्मॅश मास्टरचा तर बीडीबीए संघाने मास्टरब्लास्टर संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात रॅपटर्स संघाने बीडीबीए मास्टर संघाचा 5-3 अशा सेटमध्ये पराभ करीत विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्मॅश मास्टर संघाने मास्टरब्लास्टर संघाचा 3-1 अशा गुणांनी पराभव करीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानले. विजेत्या रॅपटर्स संघामध्ये डॉ. विकास पै, सिद्धार्थ भंडारी, अक्षय, नंदन मद्वपती, विनायक असुंडी, शैलेंद्र आदी खेळाडूंचा समावेश असून उपविजेत्या बीडीबीए मास्टर संघात पृथ्वी तेलसंग, अनिल शर्मा, डॉ. पवन, कुमार ढवले, डॉ. सुदर्शन व प्रतिक आदी खेळाडूंचा समावेश आहे. महिलांच्या दुहेरीत डॉ. दिपा मगदूम व भारती तग्गिनकेरी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर नौशाद बिजापुरे, सचिन इटगीकर, भारत पाटील, रविंद्र पाटील, अजय असुंडी, सोमशेखर खडबडी आदी मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article