महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘द रेल्वे मॅन’ : भोपाळ दुर्घटनेवरील वेब मालिका

11:37 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लेखक, दिग्दर्शक, कलाकारांचा पत्रकारांशी संवाद : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शौर्याला वाहिलेली आदरांजली

Advertisement

पणजी : अनाम विरांना समर्पित ‘द रेल्वे मॅन’ ही वेब मालिका म्हणजे खास करून भोपाळ गॅस दुर्घटनेत सापडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे, अशा भावनिक शब्दांनी या मालिकेतील अभिनेते के. के. मेनन यांनी मालिकेच्या कथानकाचा आढावा घेतला. 1984 मध्ये गाजलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील सत्य घटनांवर आधारित ‘द रेल्वे मॅन’ ही वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात दाखल झालेल्या त्या सिरीजमधील दिग्दर्शक, कलाकार यांच्या चमूने पत्रकार परिषदेत उपस्थिती लावून माध्यमांना संबोधित केले.  यावेळी बोलताना दिग्दर्शक शिव रवैल यांनी सिरीजच्या निर्मितीमागील सर्जनशील प्रक्रियेबद्दल माहिती दिली. मुख्य पात्रे कोणती भूमिका पार पाडत आहेत, त्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन योग्य संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची कलाकार आणि अन्य चमू काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

शोकांतिकेशी अनेकांचे भावबंध

या शोकांतिकेशी अनेक कुटुंबांचे भावनिक संबंध जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेदनांप्रती संवेदनशील असणे ही आपली जबाबदारी आहे. वास्तविक जीवनातील घटनांचे चित्रण करण्याचा प्रयत्न करताना आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, मात्र हे माध्यम लक्षात घेता काही प्रमाणात नाट्या असणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले. ‘द रेल्वे मॅन’ मागील कल्पनेबद्दल सांगताना लेखक आयुष गुप्ता यांनी रेल्वेची कथा सांगण्याचा आणि या संस्थेने बचावासाठी प्रयत्न करताना लोकांच्या सुटकेसाठी आपले संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्क कसे एकत्र आणले हे सांगण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. या सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आर. माधवन, के. के. मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान हे कलाकार आहेत. 18 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका सध्या नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article