महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्याच्या विकासाची घोडदौड कायम राहणार

06:16 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री सुभाष फळदेसाई यांचे प्रतिपादन : केंद्राने दिलेल्या भरीव सहकार्यासाठी : गोवा भाजपने मानले आभार

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

राज्यात सर्वाधिक काळ सत्तास्थानी राहिलेल्या काँग्रेस सरकारने विकासकामांवर जेवढा निधी खर्च केला नाही त्यापेक्षा कित्येक पटीने खर्च भाजपने आपल्या अल्प कालावधित केला आहे. केंद्राच्या पाठिंब्याने गत दहा वर्षांत गोव्यात 20 हजार कोटींचे प्रकल्प उभे राहिले असून येत्या पाच वर्षांत आणखी 30 हजार कोटींचे विकास प्रकल्प येणार आहेत, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

शनिवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी राज्य प्रवक्ते अॅड. यतीश नाईक आणि माध्यम प्रमुख प्रेमानंद म्हांबरे उपस्थित होते.

केंद्रात आणि गोव्यातही भाजपचेच सरकार असल्याने केंद्राच्या मदतीने गोव्याचा भरीव विकास होत आहे. भविष्यातही ही विकासाची गती अशीच कायम राहणार आहे. नुकतेच गोवा भेटीवर येऊन गेलेले केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यावर विशेष मेहरनजर केली असून पुढील पाच वर्षांसाठी तब्बल 30 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याद्वारे दाबोळी ते वेर्णा जंक्शनपर्यंत 1500 कोटी खर्चाचा उ•ाणपूल, मडगावसाठी सुमारे 3500 कोटी ऊपये खर्च करून 45 किमी लांबीचा बायपास रस्ता, बोरी येथे 500 कोटी ऊपये खर्च करून पुलाचे बांधकाम या आणि अशा कित्येक प्रकल्पांची उभारणी होणार आहे, असे पुढे बोलताना श्री. फळदेसाई यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी भाजप सत्ताकाळात आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रमुख विकासकामांचाही आढावा घेतला.

भाजपकडून चौफेर विकास, तरीही

काँग्रेसची नकारघंटा : अॅड. यतीश

गोव्याचा अशाप्रकारे विकास होत असतानाही काँग्रेसकडून मात्र कायम नकारघंटाच वाजविली जात आहे, यामागील त्यांचा हेतू स्पष्ट होत नाही, असे प्रवक्ते अॅड. नाईक यांनी सांगितले. गत तीन लोकसभा निवडणुकांमधून देशवासीयांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे. वर्ष 2014 मध्ये काँग्रेसचे 44 उमेदवार विजयी झाले. त्यानंतर वर्ष 2019 मध्ये ती संख्या 52 वर पोहोचली आणि आता 2024 मध्ये त्यांचे 99 उमेदवार विजयी झाले. ही आकडेवारी पाहता लोकांनी काँग्रेसला शंभरीसुद्धा पार करू दिली नाही. याउलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला स्वत:च्या 240 आणि उर्वरित  एनडीएच्या एकत्रित मिळून 300 च्या आसपास जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सतत तिसऱ्यांदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले असून लोकांच्या भाजपवरील विश्वासाची ही पावती आहे. परंतु हीच गोष्ट काँग्रेसला पचनी पडत नाही. म्हणूनच ते तथ्यहीन आरोप करत आहेत, असे अॅड. नाईक पुढे म्हणाले.

दरम्यान, 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून अधिसूचित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. वर्ष 1975 मध्ये काँग्रेस कार्यकाळात देशावर आणिबाणी लादण्यात आली होती. त्या काळात सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल झाले होते. अत्याचार करण्यात आले होते. लाखो लोकांना अटक करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर सुमारे 250 पत्रकारांना अटक करून पत्रकारिता क्षेत्राचे स्वातंत्र्यसुद्धा हिरावून घेण्याचे प्रयत्न झाले होते.

हे प्रकार थांबविण्याबरोबरच लोकशाही पुन्हा स्थापन करण्यासाठी नंतर देशवासियांनी प्रखर लढा दिला. त्यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून अधिसूचित करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

नीती आयोगाने जारी केलेल्या वर्ष 2023-24 साठीच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य’ क्रमवारीत गोव्याने देशात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल भाजपने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले आहे. तसेच यापुढे प्रथम स्थानी येण्याची मुख्यमंत्र्यांची नक्कीच फलदायी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जनतेला नको असलेले प्रकल्प लादणार नाही : फळदेसाई

जनतेच्या विरोधात जाऊन सरकार कोणताही प्रकल्प किंवा कार्यक्रम त्यांच्यावर लादणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे. उत्तर गोव्यात होणारा सनबर्न महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करण्यात येणार असल्याच्या वृत्तानंतर तेथील लोकांकडून होणाऱ्या विरोधाबद्दल विचारले असता फळदेसाई यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article