भाबड्या आशेने लागली रांग
कोल्हापूर :
टक्कल पडणे म्हणजे केसगळतीचा प्रकार पुरुषांमध्ये अधिक असतो. ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटना असते. पण अशावेळी मनात प्रश्न येतो की या टक्कल पडलेल्या डोक्यावर पुन्हा केस उगवतील का? आणि याचाच शोध घेण्यासाठी येथील महावीर गार्डनमध्ये डोक्यावर केस येण्याचे औषध लावण्यासाठी भलीमोठी रांग लागत आहे. केस येणार की नाही हा मुद्दा नंतरचा मात्र आपल्या डोकीवरही केस हवेत ही काहीसी न्युनगंडाची भावना बहुजनांना सतावत असल्याकडे ही गर्दी अंगुलीनिर्देष करतेय.
मागील पाच-सहा दिवसांपासून येथे डोक्यावर केस येण्याचे औषध लावण्याचा प्रकार सुरू आहे. सोशल मिडीयावर येथील व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर शुक्रवारी मोठी गर्दी झाली होती. डोक्यावर केस नसलेले शेकडो पुरूष रांगेत उभे राहून आयुर्वेदीक औषध डोक्यावर लावून घेत आहेत. पुणे-मुंबईपासून राज्याच्या अनेक भागातून टक्कलग्रस्त औषध लावण्यासाठी येथे गर्दी करत आहेत.