For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किती वर्षे दरमहा 1 हजार रूपयेच मानधन घ्यायचे! साईच्या कोल्हापुरातील तीनही कुस्ती केंद्रातील मल्लांचा प्रश्न

06:25 PM May 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
किती वर्षे दरमहा 1 हजार रूपयेच मानधन घ्यायचे  साईच्या कोल्हापुरातील तीनही कुस्ती केंद्रातील मल्लांचा प्रश्न
Advertisement

17 वर्षात मानधानात अजिबात वाढ नाही, एनआयएस कोचची संख्या वाढणे गरजेचे, केंद्रांमध्ये आहारतज्ञ, फिजिओथरपिस्ट नेमण्याचीही मागणी

संग्राम काटकर कोल्हापूर

भारतीय खेल प्राधिकरणाकडे (साई) दत्तक असलेल्या कोल्हापूर जिह्यातील तीनही कुस्ती केंद्रातील लहान मल्लांनी दरमहा 1 हजार ऊपयेच मानधन आणखी किती वर्षे घ्यायचे हा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय तिनही केंद्रात मल्लांना आधुनिक प्रशिक्षण देणारे दोन ते तीन एनआयएस कुस्ती कोचची गरज आहे. पण ही गरज कधी पूर्ण होणार हा आणखी एक प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर केंद्रातील मल्लांना आहारापासून ते अगदी स्पर्धांमधील कुस्तीत जोमाने लढण्यास मानसिकदृष्ट्या फीट करण्यापर्यंत आवश्यक असलेले आहारतज्ञ, सॉयकॉलॉजिस्ट, फिजिओथेपिस्ट, कन्डीशनिंग व मसाजरची केंद्रांना गरज वाटत आहे. याकडे साईने गांभिर्याने पाहून मल्लांचे चार हजार ऊपयांपर्यत मानधन वाढवणे, एनआयएस कोच, फिजिओथेपिस्ट निवडण्यास प्राधान्य द्यावे, असे जाणकारांचे सांगणे आहे.

Advertisement

भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने 1984 साली भारतीय खेल प्राधिकरणाची (साई) नवी दिल्लीत स्थापना केली. साईमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयपासून ते ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठीचा खेळाडूंना राजमार्ग दाखवण्याचे हे पहिले-वहिले काम झाले. अशा या साईने कुस्ती पंढरी कोल्हापुरात 2006 या साली मोतिबाग तालीमधील ट्रस्टी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ साई कुस्ती केंद्र व 2008 शासकीय कुस्ती केंद्र मोतिबाग तालीम अशी 2 केंद्रे सुऊ केले. तसेच 2010 साली मुरगुडमध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकुल सुऊ केले. ही तिनही केंद्रे सुऊ करण्याचे श्रेय साईचे माजी महाराष्ट्र समन्वयक चंद्रकांत चव्हाण यांना जाते. त्यांच्यामुळे जिह्यातील शेकडो मुला-मुलींना कुस्ती केंद्राच्या माध्यमातून आधुनिक धडेही घेण्याचा फ्लॅटफॉर्म मिळाला. अनेक मल्लांनी तर राष्ट्रीय शालेयसह रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित कॅडेट व ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळवली आहेत. राज्य पातळीवरील कुमार अधिवेशनमधील फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेतही काहींनी पदके जिंकली आहेत. मुरगुडच्या संकुलात घडलेल्या मुलींनी तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व कऊन साई व मुरगुडचे नाव जगाच्या पटलावर आणले.

जमेची बाजू म्हणजे साईच्या तिनही कुस्ती केंद्रामध्ये दिला जाणारा प्रवेश पारदर्शक असावा यासाठी इच्छूक मल्लांमध्ये निवड चाचणीचे आयोजन केले जाते. या चाचणीमध्ये शालेय जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवलेल्या 8 ते 14 या वयोगटातील मल्लांनाच सहभागी होता येते. चाचणीत यशस्वी होणाऱ्या 60 मल्लांना मोतिबाग तालीमधील दोन्ही केंद्रातील दोन्ही कुस्ती केंद्रात तर मुरगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकुलात 30 मुला-मुलींना प्रवेश मिळतो. कुस्ती केंद्रांमध्ये प्रवेश मिळणाऱ्या मल्लांना आधुनिक सराव करण्यासाठी अत्याधुनिक मॅट व व्यायाम साहित्य साईकडून मिळत असते. स्पोर्टस् किटसह दरमहिना 1000 ऊपयांचे मानधनही साईच देते. मात्र गेल्या 17 वर्षात या मानधानात एक नया पैशाचीही वाढ नाही. वर्षागणिक वाढणाऱ्या महागाईचे तुलनेत एक हजार ऊपयांचे मानधन तुटपुंजे आहे. हे मानधन मल्लांना खुराकासाठी सात-आठ दिवसच पुरते. त्यामुळे प्रत्येक महिन्यातील 22 दिवसांचा खर्च हा पालकवर्ग मल्लांच्या भविष्याकडे पाहून खर्च करत असतात. आणखी एक बाब म्हणजे मल्लांना कुस्तीचे धडे देण्यासाठी तीनही कुस्ती केंद्रांमध्ये प्रत्येकी तीन ते चार एनआयएस कुस्ती कोचची गरज आहे. पण एका कुस्ती कोचवरच वेळ माऊन नेली जात असल्याचे जाणकार सांगत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तीनही कुस्ती केंद्रांवर आहारतज्ञाची गरज पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही जाणकार सांगत आहेत. इतकेच नव्हे तर सॉयकॉलॉजिस्ट, फिजिओथरपिस्ट केंद्रात नेमले तर मल्ल मानसिक, शारीरिकदृष्ट्या फिट होऊन त्यांच्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व करण्याची धमक निर्माण होईल, हे उघड सत्य आहे, असेही जाणकारांचे सांगणे आहे.

Advertisement

कांदिवली (मुंबई) येथील साईच्या कुस्ती केंद्राच्या धर्तीवर कोल्हापुरातील कुस्तींमध्ये साईनेकडून मेस व आहारतज्ञाची व्यवस्था केली जावी. असे केल्याने मल्लांना कुस्तीसाठी आवश्यक असलेला आहार मिळणे सोपे जाईलच. शिवाय कुस्तीचा सराव करतेवेळी आणि स्पर्धेत कुस्ती करतेवेळी मल्लांच्या शरीरात कार्बोहायड्रेड, प्रोटीन कितपत असावे लागते आणि मल्लांना कार्बोहायड्रेड व प्रोटीन कोणत्या पदार्थांमधून मिळतात, हे फक्त आहारतज्ञच सांगू शकतो. त्यामुळे सर्व केंद्रांवर आहारतज्ञ नेमणे अत्यावश्यक असल्याचे मल्लच सांगताहेत.

Advertisement

.