For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिहादींचा अजगरी विळखा !

06:21 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिहादींचा अजगरी विळखा
Advertisement

दिल्लीच्या तख्तावर मुघल पातशाहीने राज्य केले आहे. यामुळे दिल्लीच नाही तर पूर्ण हिंदकुश हिंदुस्थान आमचा असून, पुन्हा दिल्लीत मुसलमानांचे राज्य आणणार. ही जिहादीने ग्रासलेल्या जात्यांध मुसलमानांची शपथ आहे. देशातील प्रत्येक ठिकाणी या जात्यांध मुसलमानांनी जिहादच्या नावाखाली अजगरी विळखा घालण्यास सुऊवात केली असून, या विळख्यावर वेळीच घाव घालणे आवश्यक आहे.

Advertisement

देशात हाणून-माऊन मुसलमान बनविण्याचा प्रकार राजरोसपणे सुऊ आहे. काफीरांचे जगणे हे हराम आहे. त्यांची सुंता कऊन त्यांना मुसलमान बनवा असे फतवे देशाच्या सीमेपलीकडून येत आहेत. तर या फतव्यांची अंमलबजावणी उच्चशिक्षित, व्यावसायिक आणि राजकीय जात्यांध मुसलमान करीत आहे. यासाठी हिंसेला देखील हे जात्यांध तयार आहेत. देशभक्ती तसेच वंदे मातरम या राष्ट्रगीताला देखील हे जात्यांध विरोध करीत आहेत. यामध्ये काँग्रेस प्रणीत नियुक्त माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारीचा देखील समावेश आहे. या अन्सारीनी देखील वंदे मातरम म्हणण्यास विरोध दर्शविला होता. यांच्या देशभक्तीबाबत तर काही विचाऊच नका. भारत देश पूर्ण मुसलमान करायचा असून, यासाठी या जात्यांध मुसलमानांनी जिहाद सुऊ केला आहे. हा लव्ह जिहाद, राजकीय जिहाद, व्यावसायिक जिहाद अशा अनेक प्रकारामध्ये आहे. यासाठी देशात जात्यांध मुसलमानांची संख्या वाढविण्याचे काम सुऊ आहे. तर जात्यांध मुसलमानांनी अनेक ठिकाणी जिहाद पुकारला असून, या जिहादने अनेक क्षेत्रात अजगरी विळखा घातला आहे.

त्यातीलच एक आयटी हब असलेल्या नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कॉर्पोरेट कंपनीत जात्यांध मुसलमानांनी जिहादच्या नावाखाली अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. याला साथ देत आहे तो एमआयएम सारखा जात्यांध राजकीय पक्ष. एक काळ या पक्षाचा खासदार राहिलेला इम्प्तीयाज जलील हा पत्रकार होता. आघाडीच्या वृत्तवाहिनीबरोबर काम करणारा पत्रकार अचानक जात्यांध राजकीय पक्ष असलेल्या एमआयएमच्या छत्रछायेखाली गेल्याने तो हिंदू विरोधी झाल्याचे बोलले तर वावगे ठरणारे नाही. नाशिक टीसेएसची मास्टरमाईंंड असलेल्या निदा खानला इम्प्तीयाज जलिलच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या नगरसेवकानेच छत्रपती संभाजी नगरात आश्रय दिला होता. तिच्या येथुनच मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. नाशिक टीसीएसमधील प्रकार ऐकला तरी अंगावर शहारे येत आहेत.

Advertisement

याठिकाणी, हिंदू तऊणींकडे खुलेआम

लैंगिक सुखाची मागणी करण्यात येत होती. अनेक हिंदू तरूणींवर अत्याचार करण्यात आले होते. टीसीएसमध्ये जात्यांध मुसलमानांची संख्या एवढी होती की वेळप्रसंगी ते मॅनेजमेंटला देखील धारेवर धरत असत. एवढेच नाही खुलेआम दुपारच्या वेळेस नमाज पठण केले जात असे. शुक्रवारचा दिवस तर जात्यांधासाठी झुम्माचा दिवस. यादिवशी टीसीएस हे आयटी हब नसून, मस्जीद वाटायची. एवढी दहशत या जात्यांध मुसलमानांनी जिहादच्या नावाखाली केली होती. हिंदू धर्माची अवहेलना करणे, त्यांचा तिरस्कार करणे. देव-देवतांबाबत अपशब्द उच्चारणे असे प्रकार सर्रास सुऊ होते. अखेर याचा स्फोट झाला आणि टाटा कन्सल्टन्सीच्या आठ कर्मचाऱ्यांविऊद्ध देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका अशा दोन पोलीस ठाण्यांत एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले. या गुह्यांत सामील असलेल्या दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शफी शेख, आसिफ अन्सारी, शाहऊख शेख या कर्मचाऱ्यांना आणि टीसीएस कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चौनानी (एचआर हेड) यांना अटक करण्यात आली आहे. तर फरार असलेल्या निदा खान हिला छत्रपती संभाजी नगरातून एका एमआयएम नगरसेवकाच्या घरातून अटक करण्यात आली.

जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 या चार वर्षांत संबंधित पीडित महिलांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे बऱ्याच तक्रारी केल्या, परंतु जनरल मॅनेजर चौनानी  आणि निदा इजाज खान यांनी या उच्चशिक्षित, पदवीधर महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोपींची मजल टीसीएसच्या कार्यालयात एका तऊणीचे  धर्मांतर करण्यापर्यंत गेली. त्या पीडित महिलेच्या आई-वडिलांनी जर उठाव केला नसता तर कित्येक अभागी या जात्यांध मुसलमानांच्या जिहादला बळी पडले असते. एवढेच नाही तर या सर्व प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी नाशिक पोलिसांनी टीसीएस कंपनीमध्ये साध्या वेषात गुप्तपणे काम केले असता जात्यांध मुसलमानांचा टीसीएसमधील जिहाद उघडकीस आला. टीसीएस कंपनीतील जनरल मॅनेजर अश्विनी चौनानी आणि निदा खान यांनी आरोपींवर कारवाई न करता त्यांना मदत केली. चौनानी हिस अटक करण्यात आली, परंतु गर्भवती निदा खान पळून गेली असता तिच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या. टीसीएसचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या शेजारी असलेल्या मिरा रोड येथे नयानगर परिसरात जैब जुबेर अन्सारी या जिहादीने कहर केला. धर्म विचाऊन दोन वॉचमनवर सपासप चाकू हल्ला केला. मात्र वेळीच या जात्यांध जिहादीच्या मुसक्या आवळण्यात आल्याने, पुढील संकट टळले.

जिहादच्या अजगरी विळख्याने अमरावती जिल्हा हादऊन गेला. परतवाडा शहरातील अन अहमद (19) या तऊणाचे अश्लील व्हिडीओ कांड समोर आले. त्यात 200 च्या वर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे वफत्त सर्वत्र पसरले.हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची तक्रार पोलिसांकडे केली, परंतु पोलिसांनी राजकीय नेत्यांचा आरोप फेटाळून लावला. पीडित अल्पवयीन मुली या अल्पसंख्याक समाजाच्या आहेत. त्यांना फसवून,

ब्लॅकमेल करून त्यांचे व्हिडीओ काढण्यात आले आहेत. काहींचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी राजकीय नेत्यांना दिल्यानंतर परतवाडा व्हिडीओ कांड प्रकरण शांत झाले.अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून अयान अहमद हा मुलींचे अश्लील फोटो काढायचा.

हॉटेलमध्ये (रूममध्ये) नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. बऱ्याच वेळेला तो काही तासांसाठी भाड्याने घरही मिळवायचा आणि अल्पवयीन मुलींचे  लैंगीक शोषण करायचा. अयानच्या मोबाईलमधील बरेच अश्लील फोटो त्याचा मित्र उजेर खान याने आपल्या मोबाईलमध्ये गुपचूप डाऊनलोड करून व्हायरल केल्याने अयान अहमदचा बुरखा फाडला गेला. अयानला पोलिसांनी अटक केली. त्याचे अनधिकृत घरही बुलडोझरने पाडवले.

अमोल राऊत 

Advertisement
Tags :

.