For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 जूनला झळकणार ‘द पिरॅमिड स्कीम’

06:01 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
5 जूनला झळकणार ‘द पिरॅमिड स्कीम’
Advertisement

नेटवर्क मार्केटिंग, पैशांचे आमिष अन् फसवणूक

Advertisement

पंचायत, गुल्लक, एस्पिरेंट्स पासून कोटा फॅक्ट्रीपर्यंत ओटीटीवर वेबसीरिजच्या जगतात ‘द व्हायरल फीवर’ने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. टीव्हीएफ आता एक नवी वेबसीरिज घेऊन येत असून याचे नाव ‘द पिरॅमिड स्कीम’ आहे. लवकर पैसा कमाविण्याची महत्त्वाकांक्षा आणि यामुळे मानवी जीवन बदलून टाकणाऱ्या जोखिमयुक्त जगतावर याची कहाणी आधारि आहे.

श्रेयांश पांडे यांनी आशीष शुक्ला यांच्यासोबत मिळून या सीरिजचे दिग्दर्शन पेल आहे. तर कहाणी अक्षेंद्र मिश्रा यांनी लिहिली आहे. नेटवर्क मार्केटिंगच्या जगाची ही कहाणी असून ती बाहेरून चमकणारी दिसते, परंतु प्रत्यक्षात एक मोठा स्कॅम म्हणूनसमोर येत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे.

Advertisement

द पिरॅमिड स्कीम ही सीरिज 5 जून रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर याचे पोस्टरही शेअर करण्यात आला आहे. वेबसीरिजची कहाणी सांस्कृतिक स्वरुपात समृद्ध हरिद्वारची दाखविण्यात आली आहे. याच्या केंद्रस्थानी गोल्डी (परमवीर सिंह चीमा) असून तो एक आकर्षक अन् काही  नवे करण्याची इच्छा असणारा युवक आहे. त्याला चांगल्या आयुष्याची इच्छा असुन तो लवकर पैसा कमावत श्रीमंत होऊ इच्छित असतो. याच नादात तो पिरॅमिड मार्केटिंगच्या झगमगाटात ओढला जातो. यानंतर एका घटनेमुळे त्याचे जीवन बदलून जाते. टीव्हीएफच्या या सीरिजमध्ये परमवीर सिंह चीमा आणि रणवीर शौरीसोबत शेखर सुमन, अंजन श्रीवास्तव, अल्फिया जाफरी आणि आशीष राघव मुख्य भूमिकेत आहेत. याचबरोबर अखिलेंद्र मिश्रा, स्मिता बंसल, विजय कुमार, इंद्रेश मलिक, रवि बहल, सुशांत सिंह, सोनल झा आणि सदानंद पाटील हे प्रभावी कलाकार यात दिसून येतील.

Advertisement

.