For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द पनिशर वन लास्ट किल’ 2 मे रोजी झळकणार

06:38 AM Apr 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘द पनिशर वन लास्ट किल’  2 मे रोजी झळकणार
Advertisement

फ्रँक कॅसलची होणार वापसी

Advertisement

मार्वल टेलिव्हिजनचा खास प्रोजेक्ट ‘द पनिशर : वन लास्ट किल“च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये फ्रँक कॅसल स्वत:च्या भूमिकेत वापसी करणार आहे. मार्वलने स्वत:ची आगामी सीरिज ‘द पनिशर वन लास्ट किल“चे पोस्टर शेअर केले. ही सीरिज 2 मे रोजी केवळ डिस्ने प्लसवर स्ट्रीम होणार आहे.

जॉन बर्न्थलची वापसी

Advertisement

जॉन बर्न्थल पुन्हा एकदा फ्रँक कॅसल म्हणजेच ‘द पनिशर“च्या भूमिकेत परतणार आहे. मागील वर्षी डिस्ने प्लसची सीरिज ‘डेयरडेव्हिल : बॉर्न अगेन“मध्ये त्याने ही भूमिका साकारली होती. आता तो ‘द पनिशर : वन लास्ट किल“मध्ये मुख्य भुमिका साकारणार आहे. बर्न्थल या स्पेशल प्रेजेंटेशनचा सहलेखक देखील आहे.

‘द पनिशर“विषयी...

‘द पनिशर“ मूळ स्वरुपात मार्वल कॉमिक्सचे पात्र फ्रँक कॅसलव आधारित आहे, जो स्वत:च्या परिवाराच्या हत्येचा सूड घेण्यासाठी गुन्हेगारांच्या विरोधात अत्यंत धोकादायक पद्धतीने लढतो. आता फ्रँक कॅसलची कहाणीला नव्या स्पेशल सीरिजच्या स्वरुपात जारी केले जात असून त्याचे नाव ‘द पनिशर : वन लास्ट किल“ असेल.

Advertisement
Tags :

.