तोंडवळी येथील आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच
ग्रामस्थांनी विधानसभा अध्यक्ष्यांची भेट घेत वेधले लक्ष ; अद्याप आक्षेप असणाऱ्या भागात वाळू उपसा चालूच
आचरा | प्रतिनिधी
तोंडवळी खाडीपात्रात चालू असलेल्या वाळू उत्खननाकडे मालवण तहसीलदार, महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून कोणतीही कारवाई करत नसल्याने संतप्त तोंडवळी ग्रामस्थांचे बुधवार पासून सुरू केलेले तोंडवळी वासियांचे वाळू उत्खनन विरोधातील आंदोलन शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान मालवण तहसीलदार हे ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तोंडवळी ग्रामस्थांनी पेंडुर येथे आलेल्या विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांची भेट घेत याबाबत निवेदन देत लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे.जल आलेखन सीमांकन निश्चिती होईपर्यंत वाळू उत्खनन पुर्ण बंद होण्याबाबत तहसीलदार उपस्थित राहून ठोस निर्णय देत नाही तसेच ग्रामस्थांनी पकडलेल्या वाळू होडीवर काय कारवाई केली हे जोपर्यंत तहसीलदार जागेवर येऊन लेखी उत्तर देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.