For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्या

06:01 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्या
Advertisement

लोकसभा निवडणूक-2024 : 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी होणार मतदान

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी शुक्रवार, 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी बुधवार, 17 एप्रिल रोजी सायंकाळी 21 राज्यांतील 102 मतदारसंघ क्षेत्रातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी निवडणूक आयोगाकडून पूर्ण झाली आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून मतदानाला सुऊवात होणार आहे. निवडणुकीच्या प्रथम टप्प्यात तामिळनाडू आणि उत्तराखंड या दोन राज्यातील लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.

Advertisement

पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 39 जागा असून मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यासोबतच राजस्थानमधून 12, उत्तर प्रदेशातून 8, उत्तराखंडमधून 5, अऊणाचल प्रदेशमधून 2, बिहारमधून 4, छत्तीसगडमधून 1, आसाममधून 4, मध्य प्रदेशातून 6, महाराष्ट्रातून 5, मणिपूरमधून 2, मेघालयातून 2, मिझोराममधील 2, त्रिपुरातील 1, पश्चिम बंगालमधील 3, जम्मू आणि काश्मीर, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमधील एका जागेवर मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यासाठी अखेरच्या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी आसाम आणि त्रिपुरामध्ये प्रचार केला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसामच्या जोरहाट आणि दिब्रुगडमध्येही सभा घेतल्या. एकंदर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते प्रचारात व्यस्त होते. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रियंका गांधी यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रोड शो केला. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशात काँग्रेस आठपैकी केवळ एक जागा लढवत आहे. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद हे भाजपचे राघव लखनपाल आणि बसपचे माजीद अली यांच्यात लढत होत आहे.

Advertisement
Tags :

.