For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांची तत्परता

11:40 AM Jan 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांची तत्परता
Advertisement

राजकोट किल्ला येथे पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी बायो टॉयलेट उपलब्ध

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दर दिवशी मोठया संख्येने पर्यटक दाखल होतात. याठिकाणी बायो टॉयलेट अभावी पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांनी तात्काळ बायो टॉयलेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे.राजकोट किल्ला येथे बायो टॉयलेटची आवश्यकता लक्षात घेता नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांनी नगरपरिषद स्तरावरून बायो टॉयलेट उपलब्ध करून घेतले. मात्र त्याची जोडणी व सर्व व्यवस्था नगरसेवक बापर्डेकर यांनी करून घेतली. स्थानिक नागरिक तसेच पर्यटक यांच्या मागणी नुसार नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांनी तात्काळ सेवा उपलब्ध करून दिली. याबाबत पर्यटकांनी आभार व्यक्त केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.