महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘महादेव’ अॅपच्या प्रवर्तकाला दुबईत अटक; ईडीला मोठे यश

06:41 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताकडून प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू : रवि उप्पल मुख्य आरोपी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीला मोठे यश मिळाले आहे. दुबई पोलिसांनी दोन मुख्य आरोपींपैकी एक रवि उप्पलला अटक केली आहे. उप्पलचे लवकरच भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. रवि उप्पल हा 6 हजार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग  प्रकरणातील सूत्रधार असून या प्रकरणी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे.

ईडीच्या विनंतीनुसार रेडपोलकडून जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसमुळे उप्पलला अटक झाली आहे. दुबईच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी दर्शविली आहे. महादेव अॅपचा दुसरा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला देखील युएईत लवकरच ताब्यात घेत भारतात त्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. ईडीने रायपूरच्या विशेष न्यायालयाकडून या दोन्ही आरोपींच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट मिळविले आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्यात दोघांच्या विरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी झाली होती.

उप्पलने प्रशांत महासागरातील एक बेटसदृष् देश वानुअतुचा पासपोर्ट मिळविला असला तरीही त्याने भारतीय नागरिकत्व सोडलेले नाही. महादेव ऑनलाइन बुक अॅप युएईतील एका कार्यालयातून चालविले जात होते. सट्टेबाजीचे उत्पन्न विदेशात  पाठविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हवाला मार्गाचा वापर व्हायचा असे ईडीच्या चौकशीत आढळून आले होते.

ऑनलाइन सट्टेबाजी अॅपच्या प्रवर्तकांनी काँग्रेसच्या नेत्यांना 500 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. छत्तीसगडच्या निवडणुकीत हा मोठा मुद्दा ठरला होता. भाजपने हा मुद्दा लावुन धरत काँग्रेसला पराभूत करण्यास यश मिळविले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसने ‘महादेवलाही सोडले नाही’ अशी टीका केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article