For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असनिये श्री शिवछत्रपती विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद !

05:18 PM Dec 30, 2023 IST | अनुजा कुडतरकर
असनिये श्री शिवछत्रपती विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद
Advertisement

भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांचे प्रतिपादन

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

असनिये सारख्या ग्रामीण भागातील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती कौतुकास्पद असुन या प्रशालेच्या विविध उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी दिली.बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषीक वितरण सोहळा व स्नेहसंमेलनात प्रथमेश तेली बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे संस्थापक तथा असनिये माजी सरपंच एम डी सावंत, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर सावंत, तांबोळी माजी सरपंच शिवराम सावंत, ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, शिवराम गावडे, पाडलोस कृषि विद्यालयाचे प्राचार्य समीर कोलते, असनिये पोलीस पाटील विनायक कोळापटे, रमाकांत गोवेकर (गोवा), प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ जान्हवी सावंत, शिक्षक पालक संघाचे संजय सावंत, लक्ष्मण सावंत,शालेय समिती सदस्य रामा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी एमडी सावंत यांनी विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्यासाठी ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. यावेळी इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध शैक्षणिक, कला, क्रिडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या 'रंगबहार २०२३' या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अशा कार्यक्रमांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत, सुत्रसंचालन रणधीर रणसिंग तर आभार श्री सावंत भोसले यांनी मानले.

Advertisement
Tags :

.