For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नगरसेवक देव्या सूर्याजींच्या प्रयत्नानंतर गढूळ पाण्याची समस्या दूर

04:42 PM Jan 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
नगरसेवक देव्या सूर्याजींच्या प्रयत्नानंतर गढूळ पाण्याची समस्या दूर
Advertisement

सावंतवाडी; प्रतिनिधी

Advertisement

शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्यात ड्रेनेजचे पाणी घूसून नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता. मुख्य बाजारपेठेतून ही नळपाण्याची लाईन गेली होती. निवडणुक प्रचारावेळी याबाबत नागरिकांनी आपल्या समस्या सूर्याजी यांच्याकडे मांडल्या होत्या . यानंतर देव्या सुर्याजी यांनी तात्काळ प्रशासनाला कल्पना दिली होती. प्रभाग ६ चे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७ दिवसात त्यांनी हे काम पूर्णत्वास आणले असून यामुळे १० कुटूंबांना स्वच्छ पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे तेथील रहिवाशांनी नगरसेवक देव्या सूर्याजी यांचे आभार मानले आहेत . पिण्याच्या पाण्याची दुसरी सोय नसल्याने नागरिक याच दूषित पाण्याचा वापर करत होते. यात अनेकांना आजारी देखील पडावं लागलं. नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रचारावेळी लोकांनी आपली कैफियत मांडली होती. यानंतर देव्या सुर्याजी यांनी नगरपरिषदेला कल्पना देत तात्काळ यावर उपाययोजना करण्यास सांगितली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७ दिवसांत त्यांनी याबाबत पाठपुरावा केला. मुख्य बाजारपेठून जाणारी ही पाईप लाईन बदलत नवी लाईन घालण्यात आली. त्यामुळे मंगळवारपासून या १० कुटूंबांना स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झाला आहे. गेले दिड महिना दुषित पाणी पुरवठा त्यांना होत होता. यासाठी नागरिकांनी नगरसेवक देव्या सुर्याजी व न.प. प्रशासनाचे आभार मानले आहेत. मुख्य बाजारपेठेतील ही लाईन बदलणे मोठे आव्हान होते. यासाठी प्रयत्न करणारे पाणी पुरवठाचे श्री.संजय पोईपकर, इंजिनिअर श्री.दिनेश बर्डे,प्लंबर जावेद यांच्यासह सहकार्य करणारे बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांचे नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी आभार मानले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.