ऊस तोडी सुरू झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न संपुष्टात
खोची प्रतिनिधी
सध्या खोचीसह परिसरात ऊस तोडी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. शेतकरी संघटनेने मागील हप्त्यासाठी केलेले आंदोलन व अवकाळी पडलेल्या पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे ऊस तोडी लांबल्या होत्या.त्यामुळे बारमाही तुडूंब भरून वाहणाऱ्या वारणा नदीकाठचा शेतकरी जनावरांच्या चाऱ्यांच्या बाबतीत अडचणीत सापडला होता. ऊस तोडी सुरू झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याच्या बाबतीत अडचणीत सापडलेला पशुपालक शेतकरी थोडा आनंदित झाला आहे. या भागात सध्या वारणा,शरद,पंचगंगा, छत्रपती राजाराम बावडा,दालमिया आदी साखर कारखान्याच्या ऊस तोडी सुरू झाले आहेत.त्यामुळे उसापासून मिळणारे वाडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहे. ह्या वाड्यामूळे नोव्हेंबर अखेर पर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात भेडसावत असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे.सध्या हे ऊसाचे वाडे थोडे महाग असले तरी जनावरांच्या चाऱ्याची सोय होते.म्हणून याकडे आर्थिक तोटा न पाहता जनावरांची भूक महत्त्वाची म्हणून खरेदी केली जात आहे.अनेक पशुपालक शेतकरी सकाळी लवकर ऊस तोडणी करून आपल्या जनावरांच्या चाऱ्याची सोय करताना दिसत आहेत.एकंदरीत कोणत्या ना कोणत्या प्रकारे जनावरांच्या चाऱ्याची सोय सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या भागात अवकाळी प्रचंड पडलेला पाऊस व ऊस दरासाठी चेआंदोलन यामुळे नुकसान झालेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न संपून जनावरे सध्या पोट भरून वैरण खाऊ लागली आहेत.त्यामुळे जनावरांच्या पासून मिळणाऱ्या उत्पन्नात ही वाढ होऊ लागली आहे.त्यामुळे पशुपालक शेतकरी सध्या जनावरांच्या बाबतीत समाधानी आहे.
सध्या हे वाडे थोडे महाग आहे.दहा रुपयाला दहा गऱ्याच्या पाच पेंढ्या आता मिळत आहेत.एक आठवड्यात आणखीन तोडी वाढण्याची शक्यता आहे.मोठ्या प्रमाणात ऊस तोडी सुरू होऊन अधिक वाढे उपलब्ध होऊ लागल्यावर हे वाडे थोड्या प्रमाणात स्वस्त होऊन दहा रुपयाला सात-आठ पेंड्या मिळतात.त्यामुळे या वाड्याकडे पशुपालक शेतकरी जनावरांच्या चाऱ्याची अडचण समजून मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. हे वाडे फेब्रुवारी पर्यंत जनावरांच्या चाऱ्याचे मोठे आधार बनते.त्यामुळे वाडे हेच जनावरांचे सध्या प्रमुख खाद्य बनले आहे.
सध्या ऊस टोळ्यांची कमतरता असल्याने अनेक शेतकरी मशीनच्या साह्याने ऊस तोडणी करून घेत आहेत.मशीनच्या तोडणी पुढे अनेक पशुपालक उसाचे वाढे मारून आपल्या जनावरांच्यासाठी चारा उपलब्ध करताना दिसत आहेत.मात्र चारा हे उद्दिष्ट ठेवताना अनेक पशु मालक वाड्यामध्ये उसाच्या कांड्या घेत असल्याने शेतकरी वर्गाचा तोटा होत असल्याने शेतकरी चाऱ्यासाठी वाडे तोडणाऱ्या पशुपालकांना विरोध करत आहेत.तर काही शेतकरी व्यवस्थित वाडे तोडून आपल्या जनावरांच्या चाऱ्यांची उपलब्धता करून ठेवत आहेत.