For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिंद्रा थारची किंमत 20,000 पर्यंत वाढणार

06:56 AM Jan 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिंद्रा थारची किंमत 20 000 पर्यंत वाढणार
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या सर्वात लोकप्रिय एसयूव्ही थारची किंमत 20,000 ने वाढवली आहे. तथापि, त्यांच्या एंट्री-लेव्हल म्हणजेच बेस मॉडेलची किंमत बदललेली नाही आणि आता ती 9.99 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. या बदलानंतर, थारचे टॉप-स्पेक मॉडेल 17.19 लाखांपर्यंत वाढले आहे. त्याचवेळी, पेट्रोल 2डब्लूडी ऑटोमॅटिक प्रकार आता 14.19 लाख आहे.

थार प्रामुख्याने दोन ट्रिममध्ये येते एएक्सटी आणि एलएक्सटी, ज्यामध्ये 2-व्हील ड्राइव्ह(2डब्लूडी) आणि 4-व्हील ड्राइव्ह(4डब्लूडी) पर्याय आहेत. महिंद्राने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याचे फेसलिफ्ट लाँच केले. एसयूव्हीचा लूक आणि डिझाइन पूर्वीसारखाच आहे, परंतु काही कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले आहेत. फीचर्स लिस्ट पूर्वीपेक्षा मोठी आहे आणि केबिनमध्ये अनेक अपग्रेड आहेत, ज्यामध्ये नवीन टच क्रीन आणि स्टीअरिंग व्हीलचा समावेश आहे. याशिवाय, सुरक्षेसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखी वैशिष्ट्यो देण्यात आली आहेत. सॉफ्ट-टॉप काढून टाकण्यात आला आहे. महिंद्रा थार फोर्स गुरखा 3-डोअर आणि मारुती जिमनीशी स्पर्धा करते.

Advertisement

Advertisement
Tags :

.