महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हंगेरीच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

06:43 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाल लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला माफी अंगलट

Advertisement

वृत्तसंस्था/ बुडापेस्ट

Advertisement

हंगेरीच्या अध्यक्ष कॅटलिन नोवाक यांनी राजीनामा दिला आहे. बाल लैंगिक शोषणाच्या आरोपीला माफी दिल्यावर चहुबाजूने टीका होऊ लागल्याने त्यांना पद सोडावे लागले आहे. माझ्याकडून चूक झाली आहे. मुलांचे लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी असलेल्या व्यक्तीला माफी देण्याच्या निर्णयामुळे अनेक लोकांना ठेच पोहोचली आहे. मी नेहमीच मुले आणि कुटुंबांच्या सुरक्षेच्या बाजूने राहिली असून राहणार असल्याचे नोवाक यांनी म्हटले आहे.

एप्रिल 2023 मध्ये चिल्ड्रन होमच्या माजी उपसंचालकाला माफी देण्यात आली होती. या उपसंचालकाने मुलांचे लैंगिक शोषण केलेल्या स्वत:च्या वरिष्ठाला मदत केली होती. उपसंचालकाला माफी प्रदान केल्यावर अध्यक्षांना देशात विरोधाला तोंड द्यावे लागले होते. 9 फेब्रुवारी 2024 रोजी लोकांनी अध्यक्षीय भवनाबाहेर जमून निदर्शने केली होती. तसेच अध्यक्ष कॅटलिन नोवाक यांच्या राजीनाम्याची मागणी निदर्शकांनी केली होती.

नॉर्वेच्या शिक्षण मंत्र्याचाही राजीनामा

यापूर्वी 25 जानेवारी रोजी नॉर्वेच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यावर कॉपीचा आरोप होता. शिक्षण मंत्री सँड्रा बोर्च यांनी 2014 मध्ये मास्टर  डिग्रीकरता सादर केलेल्या प्रबंधाला कॉपी पेस्ट केले होते अशी कबुली दिली होती. अन्य विद्यार्थ्याचा प्रबंध पाहून स्वत:चा प्रबंध लिहिला होता. मी स्रोताचे नावही नमूद केले नव्हते असे 35 वर्षीय सँड्रा बोर्च यांनी म्हटले होते. प्रबंधात संबंधित स्रोताचा उल्लेख करणे अनिवार्य असते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article