For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावगाव कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्यात

10:00 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावगाव कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्यात
Advertisement

सिकंदर शेख-मिलाद इराण यांच्यात प्रमुख लढत

Advertisement

सावगाव : येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटनेतर्फे आयोजित कै. परशराम सावगाव व सुरेश अगंडी यांच्या स्मरणार्थ भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन रविवार दि. 14 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. या मैदानाची तयारी अंतिम  टप्यात करण्यात आली आहे. या कुस्तीमैदानात  25 हजरापेक्षा जास्त कुस्ती शौकिनाची बसण्यासाठी  वेवस्ता करण्यात आली आहे. प्रमुख कुस्त्या प्रकाश झोताता होणार असुन त्यासाठी  प्रखर प्रकासाठी मोठ्याप्रमाणात लाईटसची सोय करण्यात आली आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (कोल्हापूर) व आंतरराष्ट्रीय पदक विजेता मिलाद इराण यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उदयकुमार दिल्ली व महाराष्ट्र चॅम्पियन समिर शेख, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती अरुण बोंगाडे (मोतीबाग) व उमेश चव्हाण (कोल्हापूर), चौथ्या क्रमांकाची कुस्ती संदीप हरियाणा व कर्नाटक केसरी नागराज बशिडोणी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती कमलजीत पंजाब व शिवाप्पा द•ाr, सहाव्या क्रमांकाची कुस्ती कामेश पाटील (कंग्राळी) व सुनील करवते (कोल्हापूर), सातव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व किरण जाधव (कोल्हापूर), आठव्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार कार्वे व पवन चिक्कदिनकोप, नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व संजू इंगळगी, दहाव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज कंग्राळी व लालू मोतीबाग यांच्यात होणार आहे. मानाच्या गदेची कुस्ती ओमकार सावगाव व हरी मास्कोन्नटी तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती अवधुत माळी (गंगावेश) व शिवलिंग धारवाड (कर्नाटक) यांच्यात होणार आहे. आकर्षक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून पहिली कुस्ती बेळगावचा उगवता मल्ल पार्थ पाटील (कंग्राळी) व वरुण (मठपती आखाडा), दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रुपेश कर्ले व उमेश शिरगुप्पी (स्पोर्ट्स हॉस्टेल), तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती स्वप्निल सावगाव व ज्ञानेश्वर मजगाव, चौथ्या क्रमांकाची कुस्ती मंथन सांबरा व सोहेल रणकुंडे यांच्यात होईल. या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.