सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोरील खड्डा अखेर बुजविला
पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून दखल
न्हावेली/वार्ताहर
सावंतवाडी रेल्वे स्थानका समोरच्या मुख्य महामार्गावर पडलेल्या एका मोठ्या खड्डयामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली. त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला हा खड्डा बुजविण्याचे आदेश दिले.त्यानंतर विभागाने त्वरित कार्यवाही करत हा खड्डा तत्काळ बुजविला.त्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला आहे.गेले अनेक दिवस हा खड्डा वाहतुकीसाठी धोकादायक ठरत होता.विशेषत : रात्रीच्यावेळी आणि पावसाळ्यात खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.या समस्येची दखल कोणी घेत नसल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले होते.याची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली.त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन हा खड्डा त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश दिले.त्यांच्या आदेशानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.आणि आवश्यक साहित्य वापरुन खड्डा बुजवला.