महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विरोधी पक्षांची भूमिका अयोग्य; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे वक्तव्य

06:32 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे सहभागी झाले. यादरम्यान बोलताना देवेगौडा यांनी पंतप्रधान मोदींना आज पूजा करण्याची मिळालेली संधी देवाकडून देण्यात आलेल्या एका उपहारासमान असल्याचे म्हटले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता आमंत्रित करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देवेगौडा यांनी आभार मानले आहेत.

Advertisement

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा हा अनमोल दिन आहे. मला आणि माझ्या पत्नीला या पवित्र सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. हा आज एक ऐतिहासिक दिन आहे. आमच्या भगवान रामाला आम्ही ‘पुरुषोत्तम’ म्हणतो, त्यांच्यात दृढविश्वास आहे. मी पंतप्रधान मोदींचेही आभार मानू इच्छितो. पंतप्रधान मोदी एक अनमोल व्यक्ती आहेत, हे ईश्वरदत्त संधींपैकी एक आहे. मोदींना भगवान विष्णू आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाला असल्याचे देवेगौडा यांनी म्हटले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंबंधी विरोधी पक्षांनी घेतलेली भूमिका योग्य नसल्याचे वक्तव्य देवेगौडा यांनी यावेळी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article