महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रदर्शनीय क्रिकेट स्पर्धेत पोलीस संघाला अजिंक्यपद

10:08 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महांतेश कवडीमठ क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Advertisement

बेळगाव : मराठा स्पोर्ट्स बेळगाव आयोजित महांतेश कवडगी मठ चषक निमंत्रतांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी प्रदर्शनीय सामन्यातून अंतिम सामन्यात पोलीस संघाने एडवोकेट संघाचा दहा गड्यांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले. शशी पम्मारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.मालिनी सिटी मैदानावर कवटगीमठ चषक निमंित्रतांची ऑल इंडिया टेनिस बॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शरद कवट गीमठ , भरतअण्णा पाटील, गीता सुतार राजशेखर डोनी, आनंद चव्हाण नितीन जाधव जयंत जाधव अमर अकनोजी, अनिल कुरणकर, संदीप नरसगौडा, दिग्विजय सिद्धनाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन. व मैदानाचे पुजन मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मैदानात यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रदर्शनीय सामन्याला सुरुवात करण्यात आली पहिल्या सामन्यात प्रिंट मीडिया संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात 3 गडी बाद 41 धावा केल्या. उत्तरदेताना केईबी संघाने सहा षटकात 5 गडी बाद 37 धावाच केल्या. दुसऱ्या सामन्यात इलेक्ट्रॉक मीडियाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात चार गडी बाद 36 धावा केल्या. त्याला उत्तर देताना पोलीस संघाने 2.3 षटकात एक गडी बाद 40 धावा करून सामना नऊ गड्यांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात अॅडव्होकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 4 गडी बाद 48 जमा केल्या. त्याला उत्तर देताना सीए संघाने चार शतकात एक गडी बाद 34 धावाच केल्या. अंतिम सामन्यात पोलिस संघाने अॅडव्होकेटचा 10 गड्यांनी जिंकला. सामन्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या पोलिस व उपविजेत्या अॅडव्होकेट संघाना चषक देऊन गौरविण्यात आले.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article