For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सोलापूरचा पारा 40 अंशांवर अन् वऱ्हाडी घामाघूम!

02:00 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूरचा पारा 40 अंशांवर अन् वऱ्हाडी घामाघूम
Advertisement

                       सोलापुरात लग्नसराईची धामधूम

Advertisement

सोलापूर -सध्या सर्वत्र लग्नसराईची मोठी धामधूम सुरू आहे. वैशाख वणव्याच्या झळा बसत असतानाच लग्नाचे मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये  वऱ्हाडींच्या गर्दीने फुलून गेली.  इथे अंशांच्या तापमानाचा दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे वऱ्हाडी मंडळी अक्षरश घामाघूम होताना दिसत आहेत. हा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे, पण वाढते ऊन आणि उकाड्यामुळे लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडींचे मात्र हाल होत आहेत.

शहरी भागात मंगल कार्यालयात कापडी मंडपांना नाही हिव्या मांडवाची सरलग्नासाठी येणाऱ्या वाड्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते, तर, ग्रामीण भागात अशी सोय नसल्याने झाडांच्या फांद्यांचे पारंपरिक मंडप उभारले जात होते, मात्र आता ही परत मोडीतकाढून भव्य कापडी मंडप उभारले जात असल्याने उन्हाच्या झळा व उकाडा सहन करीत वऱ्हाडींना विवाह सोहळा उरकावा लागत आहे.

Advertisement

सध्या तापमानाचा पारा ४०अंशांच्या पार गेला आहे. अशा परिस्थितीत दुपारी होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी येणाऱ्या पाहुण्यांची मोठी तारांबळ उडत आहे. भरजरी साड्या, जड दागिने आणि सूट-बूट परिधान केलेल्या वऱ्हाडींना उन्हाच्या तीव्र झळा आणि घामामुळे लग्नाचा आनंद लुटणे कठीण होऊन बसले आहे. उन्हामुळे वऱ्हाडीं जेवणापेक्षा पाणी पिण्यावरच अधिक भर देत आहेत.जिल्ह्यात सर्वत्र लग्नसराईची गोठी धामधूम सुरू असून वैशाख वणव्याच्या झळा बसत असताना ग्रामीण भागातही वाडीसाठी आकर्षक कापडी मंडप उभारले जात आहेत.

ग्रामीण भागात लग्न म्हटले की, मंगल कार्यालय लग्न सोहळ्यासाठी सजवले जात आहेत, हिरव्यागार झाडांच्या फांद्या तोडून आणून वधू-वराच्या अंगणात लग्न मंडप लावले जात आहेत. आता हजारो रुपये खर्च करून काही क्षणापुरते लग्न मंडप उभारले जात आहेत. वाढत्या उषम्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लग्नसमारंभात आता कुलर, एअर कंडिशनिंगची व्यवस्था करण्यासाठी जादा खर्च केला जात आहे.

Advertisement
Tags :

.