‘रायगडला जेंव्हा जाग येते’नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला
कोल्हापूर :
कोल्हापुरातील सुगुण नाट्याकला संस्थेच्या वतीने प्रा. वसंत कानेटकर लिखित सुनील घोरपडे दिग्दर्शित ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकाने 63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पडदा उलघडला. नाटकातील प्रत्येक कलाकाराने आपल्या कलाविष्काराने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. नाट्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी, लिथो प्रेसचे हर्षराज कपडेकर, ज्येष्ठ कर्मचारी आनंदा देसाई यांचा सन्मान करण्यात आला. नाट्यास्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय नाट्या परिषद कोल्हापूर शाखाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
शाहू स्मारक भवन येथे 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दररोज सायंकाळी 7 वाजता तब्बल 19 नाटकांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. यातून दोन नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मातब्बर नाट्यासंस्थांच्या दर्जेदार नाटकांनी स्पर्धेमध्ये जान आणली आहे. सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ कलावंतांच्या सत्काराने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूरचे रसिक दर्दी असून जे कराल ते मन लावून करा असा सल्ला सत्कारमुर्ती कलावंतांनी दिला. स्पर्धेचे परिक्षक अविनाश कोल्हे, प्रवीण शांताराम, पूर्वा खालगावकर यांचाही सन्मान करण्यात आला.
‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील वैचारिक तफावत मांडली आहे. संभाजीराजेंना शिवाजी महाराज यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी अष्टप्रधान व स्वकियांनी केलेले कावे या नाटकात नमूद केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळी लोकशाही प्रणाली अमलात आणली होती. अष्टप्रधानांच्या हातात स्वराज्याची सुत्रे दिल्यापासून ते स्वत:ला स्वराज्याचे मालक समजू लागले. छत्रपती संभाजीराजे यांचा एकछत्री कारभार त्यांना नको होता, म्हणून त्यांनी शिवरायांच्या मनात शंभूराजेंविषयी संभ्रम निर्माण केला होता. दोन पिढ्यांच्या स्वभावातील अंतर या नाटकातून आधोरेखित केले आहे. पित्याच्या मनीची माया ही काय असते ती पित्याच्या हयातीत मुलांना समजत नाही, पण मृत्यूनंतर पदोपदी समजते, असा संदेश या नाटकातून दिला आहे. नाट्यास्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मान्यवरांचे स्वागत समन्वयक प्रशांत जोशी यांनी केले. सूत्रसंचालन पंडीत कंदले यांनी केले.