नेपाळमध्ये विमान धावपट्टीवरून घसरले
06:06 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ काठमांडू
Advertisement
नेपाळमधील भद्रपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री लँडिंगदरम्यान बुद्ध एअरचे विमान धावपट्टीवरून घसरले. याप्रसंगी विमानात 50 प्रवासी होते. सर्व सुरक्षित असून त्यांना बाहेर काढण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. विमान काठमांडूहून भद्रपूरला दाखल झाले होते. भद्रपूर येथे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उतरताना विमान धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीपासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या एका लहान नदीजवळ ते थांबल्यामुळे दर्शनी भागाचे नुकसान झाले. या अपघाताबाबत सखोल चौकशी करण्याची सूचना प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement