महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अयोध्येतील धावपट्टीवर उतरले विमान

06:22 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनापूर्वी परीक्षण

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. येथे 17 जानेवारीपासून कार्यक्रम सुरू होणार आहेत. आठवडाभर अनेक कार्यक्रम, समारंभ आयोजित केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. याचनुसार अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणापूर्वी परीक्षण पार पडले आहे. याकरिता धावपट्टीवर विमानाचे लँडिंग करविण्यात आले आहे.

अयोध्येकरिता लवकरच आता हवाई सेवा सुरू होणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 30 डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी दिल्लीतून पहिले उड्डाण या विमानतळावर उतरणार आहे. यापूर्वी व्यवस्थांच्या तपासणीसाठी शुक्रवारी परीक्षण पार पडले आहे. इंडिगो एअरलाइन्स पहिल्या टप्प्यात अयोध्या ते दिल्ली आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. विमानाद्वारे 1 तास 20 मिनिटात दिल्ली ते अयोध्या असा प्रवास करता येणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article