महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चहा पिण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले ठिकाण

06:29 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात सर्वाधिक चहा पिणारे लोक कुठे राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? हे ठिकाण भारत तसेच चीनमध्ये देखील नाही. युरोपीय देश असलेल्या जर्मनीतील ठिकाणाने चहा आणि चहा पिण्याची एक अनोखी आणि आकर्षक परंपरा विकसित केली आहे.

Advertisement

जर्मनीतील कमी लोकसंख्या असलेल्या उत्तर-पश्चिम कोपऱ्याला ईस्ट फ्रिसिया नावाने ओळखले जाते. येथील लोक प्रत्यक्षात जगातील अन्य कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक चहा पित असतात. पूर्व फ्रिसियन लोकांमध्ये दरवर्षी दरडोई 300 लिटर चहाचे सेवन होते. तसेही सर्वाधिक चहा पिणाऱ्या देशांमध्ये तुर्किये पहिल्या स्थानी आहे, तर भारताचे लोक 29 व्या क्रमांकावर आहेत.

Advertisement

पूर्व फ्रिसियन लोक हे जगभरातील अन्य चहा पिणाऱ्या संस्कृतींपेक्षा वरचढ ठरले आहेत. पूर्व फ्रिसियनमध्ये एक टी म्युझियम असून त्याला बीटिंग टी म्युझियम म्हटले जाते. येथील लोकांसाठी चहा केवळ एक पेय नसून त्यापेक्षा अधिक थंडीत सकाळी गरमपणा देणारी ऊर्जा आहे. चहा एक अनोखे वातावरण निर्माण करण्यासाठी तेथे तयार केला जातो.

तेथे चार लोक एकत्र येताच चहा समारंभ सुरू होतो. सर्वप्रथम एका कपाखाली  रॉक शुगर किंवा क्लुंटजेचा एक तुकडा टाकण्यात येतो. मग तप्त पाण्यात तयार चहाचे पेय मोठा सुगंध देते, एक खास अरोमा, ही गरम चहा कपात ओतल्यावर साखरेवर पडल्यावर एक सौम्य आवाज येतो, मग चमच्याद्वारे क्रीम दाट क्रीम काढली जाते आणि चमचा कपाच्या काठावर फिरवत त्यात मिसळली जाते. क्रीम हळूहळू आत जाते मग चमचा उलट्या दिशेने फिरविण्यात येतो, काही क्षणाच्ता चहाच्या वर क्रीमचे पांढरे तुकडे तरंगू लागतात. क्रीम प्रथम खाली जाते, मग लवकरच वरच्या दिशेने येते, यामुळे एक असा प्रभाव निर्माण होतो, ज्याला स्थानिक लोक ‘वुल्कजे’ म्हणतात, याचा अर्थ छोटे ढग’ असा होतो. मग या चहाच्या कपाला हातात पकडून न हलवता तीन टप्प्यांमध्ये स्वाद घेतला जातो.

पहिल्यांदाच दाट क्रीमचा स्वाद येतो, दुसऱ्या टप्प्यात काळ्या चहाचा स्वाद येतो, अखेरच्या घोटात विरगळणाऱ्या रॉक शुगरचा गोड स्वाद जाणवू लागतो. हे तीन टप्पे पुन्हा केले जातात, कारण पूर्व फ्रिसियन लोक सर्वसाधारणपणे एकावेळी किमान तीन कप चहा पित असतात. यजमान नेहमी चहा ओतत असतो, एखाद्या व्यक्तीने सावधपणे रिकामी कपात चमचा ठेवला तरच तो थांबतो. याचा अर्थ आता आणखी चहा नको असा होतो.

पूर्व फ्रिसियात चहा पिणे सकाळपासूनच सुरू होते. येथे सातत्याने चहा पिणे सामान्य बाब आहे. येथे सकाळी प्रारंभी नाश्त्याची सुरुवात चहाद्वारे होते, दुपारी देखील चहा मिळतो, संध्याकाळी पुन्हा चहा सोबतीला असतो. अनेक पूर्व फ्रिसियनल झोपण्यापूर्वी चहा पितात. याचमुळे येथील चहाची वेळ सहजपणे दिवसात चार किंवा पाचवेळा असते.

ईस्ट फ्रिसियाचा चहा काळ्या चहाचे मिश्रण असतो, यात बहुतांशकरून आसामची चहापत्ती असते. येथे चहाघरांमध्ये चहा उपलब्ध होतो. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी चहाघरांमध्ये चहा पिणे एक वेगळा अनुभव असतो. चहा येथील स्थानिक जीवन आणि संस्कृतीत सामावलेला आहे. डच व्यापाऱ्यांनी 17 व्या शतकात मोठ्या प्रमाणात चहाला युरोपमध्ये आणण्यास सुरुवात केली. मग हे या क्षेत्राचे विशिष्ट प्रतीकच ठरले. 17 व्या शतकाच्या मध्यात चहा प्रामुख्याने श्रीमंत पूर्व फ्रिसियन लोकांसाठी राखीव होता. 1850 च्या आसपास जोपर्यंत इंग्रजांनी आसामच्या भारतीय क्षेत्रात चहाचे मळे निर्माण करण्यास सुरुवात केली नाही तोपर्यंत चहा स्वस्त झाला नव्हता. चहा स्वस्त झाल्यावर त्याचा स्वाद कुणालाही घेणे शक्य झाले हेते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article