कंदिलांचे शहर या नावाने प्रसिद्ध ठिकाण
होई एन हे व्हिएतनाममधील सर्वात अद्भूत शहर आहे. हे क्वांग नेम प्रांतात थू बॉन नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. सूर्यास्त होताच शहरातील रस्ते आणि बाजारपेठ कंदिलांच्या प्रकाशाने उजळून निघते, अशाप्रकारे येथील लोक मंद चमकणाऱ्या रंगबिरंगी ‘जादुई’ प्रकाशात बुडून जातात. व्हिएतनाममधील सर्वात अनोखे शहर होई एनला कंदिलांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. थू बॉन नदी होई एनची जीवनधारा आहे. येथे स्थानिक लोक पर्यटकांना कंदिलांच्या प्रकाशात नौकांमधून नदीची सैर घडवून आणत असतात. होई एन सिटीतील नदीवर असलेल्या शेकडो नौका आणि कंदिलांचा प्रकाश पाहणे अत्यंत आनंददायी असते. पूर्ण शहर कंदिलांच्या प्रकाशात जिवंत वाटू लागते. हे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. होई एन हे प्राचीन शहर असून अनेक वर्षांपासून व्हिएतनाममध्ये एक प्रसिद्ध आणि मनमोहक पर्यटनस्थळ राहिले आहे.
होई एन शहरात इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा अजब संगम दिसून येतो. स्वत:चे ऐतिहासिक महत्त्व आणि स्थापत्यशैलीमुळे हे एक अद्भूत शहर आहे. येथे चिनी शॉपहाउस, फ्रेंच वसाहतकालीन इमारती आणि व्हिएतनामी ट्यूब हाउस दिसून येतात. जपानी कवर्ड ब्रिज, बँग बीच आणि टॅन क्य चे जुने घर देखील येथील मुख्य आकर्षणांमध्ये सामील आहे. पूर्ण शहर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत सामील आहे. 7 व्या शतकातील प्राचीन शहर अशी याची नोंद आहे. होई एन प्राचीन शहर असून ते एकेकाळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य केंद्र होते. 17 व्या आणि 18 व्या शतकादरम्यान चिनी, जपान आणि पाश्चिमात्य व्यापारी जहाजांसाठी एक मध्यस्थांनी असलेले बंदर होते. होई एनचा उल्लेख प्राचीन भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या घरांच्या रांगा आणि रात्रीच्या वेळी कंदिलांनी उजळून निघणाऱ्या नदीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शहर प्रत्येक ऋतूत सुंदर दिसत असले तरीही उन्हाळ्यात येथे मोठ्या संख्येत पर्यटक येत असतात.