For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्थसंकल्पानंतर 'बांधकाम'चे चित्र होणार स्पष्ट

04:14 PM Jan 30, 2025 IST | Radhika Patil
अर्थसंकल्पानंतर  बांधकाम चे चित्र होणार स्पष्ट
Advertisement

कोल्हापूर / विद्याधर पिंपळे : 

Advertisement

सिमेंट, स्टील, कामगारांची वाढलेली मजूरी, इंधन आदी दरामध्ये वाढ झालेली आहे. पुढील आठवड्यात जाहीर होणारा केंद्रीय अर्थंसंकल्प, यंदा रेडिरेकनर संभाव्य दरातील वाढ, सिमेंट, स्टील व्यवसायातील वाढती मक्तेदारी, हद्दवाढीचा प्रलंबित प्रश्न, यामुळे बांधकाम व्यवसायाचे चित्र अर्थसंकल्पानंतरच स्पष्ट होणार आहे. सद्या कोल्हापूरात नवीन 297 बांधकाम प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये पुर्नविकासालाही चालना मिळू लागली आहे. शहरात बांधकामाचा दर स्क्वेअर फूटाला 2500 रूपये, तर तयार फ्लॅटचा दर एरियानुसार 5000 पासून 7000 रूपये स्क्वेअर फूट असा झाला आहे.

सिमेंट, स्टील, कामगारांच्या मजुरीबरोबर कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम करणे आता सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर गेले आहे. तरी देखील कोल्हापूरातील बांधकाम वेगाने सुरू आहेत. शहराची हद्दवाढ न झाल्याने, 11 मजली बांधकाम वाढत आहे. जुन्या फ्लॅटचे पुर्नविकासाचे काम सुरू आहे. इतर मोठया शहरांच्या तुलनेत कोल्हापुरातील बांधकामाचा दर कमी असल्याने, बाहेरील लोकाचा कल कोल्हापूरकडे वाढू लागला आहे. त्यांच्याकडून टू व थ्री बीएचके फ्लॅटची मागणी वाढली आहे. दरवाढीमुळे नवीन बांधकामासाठी बांधकाम व्यावसायिकांना आता किमान स्क्वेअर फूटाला 500 रूपयांची वाढ होण्याचे संकेत आहेत.

Advertisement

  • सिमेंट कंपन्यांची वाटचाल मक्तेदारीकडे

देशात सिमेंट दरावर कोणाचेच नियंत्रण नाही. या कंपन्या सिमेंटचा जो दर काढतील त्या दरानेच सिमेंटचा दर घ्यावा लागत आहे. यामुळे बांधकामदारांना सिमेंटसाठी खर्च वाढत आहे. सिमेंटचा दर 330 ते 350 रूपये गोणी (50 किलो) अशी आहे. सिमेंट उद्योगामध्ये छोटया सिमेंट कंपन्या मोठया कंपन्यामध्ये मर्ज होऊ लागल्या आहेत. कांही महीन्यानंतर देशात फक्त अदाणी व टाटा या सिमेंट कंपन्या राहणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे. यामुळे सिमेंट व्यवसायामध्ये या कंपन्याची वाटचाल मक्तेदीरीकडे सुरू आहे. यामुळे सिमेंट दरावर सरकारने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

गेल्या कांही दिवसापासून स्टीलच्या दरात वाढ झाली आहे. स्टीलचा दर आता किलोला 61.50 पैसे असा झाला आहे. यांमुळे बांधकामाचे एस्टीमेट पूर्णपणे विस्कळीत होऊन, बांधकाम खर्चामध्ये ही वाढ झाली आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने स्टील व सिमेंट दरावर नियंत्रण ठेवण्याचा विचार होणे गरजेचे असल्याचे आहे.

  • विट, क्रॅश सॅन्ड ही महागले

बांधकामसाठी लागणाऱ्या लाल विटांचा तसेच व्रॅश सॅन्डचा दरही वाढला आहे. वाहतूकीचा दर ही वाढला आहे. कारण पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने, वाहतूक करणे आता परवडत नाही. पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरीचा टप्पा पार केल्याने वाहतूक दरही वाढला आहे. लाल विटा शेकडा दर 1200 ते 1250 रूपये असा होता. तो आता दर 1400 रूपये झाला आहे. तर क्रॅश सॅन्ड ब्रासला 3000 वरून 3500 रूपये झाली आहे.

  • मजूरीचा दरही वाढला

महागाईचा परिणाम कामगार क्षेत्रावरही बसला आहे. बांधकाम क्षेत्रामधील कामगार हे स्थानिक, कर्नाटक, राजस्थान येथील असून,त्यांच्या बांधकामाच्या दर्जावर त्यांची मजूरी ठरत असते. सध्या त्यांची मजूरी परवडत नसल्याने त्यांनी सुध्दा मजूरीचा दरही वाढवला आहे. 160 ते 170 रूपये स्क्वेअर फूट असलेली बांधकाम मजूरी आता 200 रूपये केली आहे.

  • पंतप्रधान आवास योजनेलां चालना मिळावी

सर्वसामान्यांना परवडणऱ्या घरासाठी पंतप्रधान आवास योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्यानां घर मिळण्याबरोबर बांधकाम क्षेत्रात मोठा रोजगार ही मिळणार आहे. रेडिरेकनरचा दर गेली तीन वर्षांपासून स्थिर आहे. यावर्षी 10 ते 15 टक्क्यानी रेडिरेकनरच्चा दर वाढ होण्यच्ची शक्dयाता आहे. याचा सर्वसामन्यांना फटका न बसता , बांधकाम व्यावसयिकानां बसणार आहे. कारण रेडिरेकनरचा दर वाढल्यास टीडीआर, प्रिमियम, परवाना फीसह मजूरीच्या दरात ही वाढणार आहे.

                                                                              सचिन ओसवाल ,उपाध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर

Advertisement
Tags :

.