‘आण्विक संकटा’च्या भीतीनंतर बदलले चित्र
3 देशांच्या राजधानींमध्ये हालचालींना वेग : भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीमागे मोठा घटनाक्रम
9 मे रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात हस्तक्षेप करणार नाही, हे आमचे काम नाही अशी भूमिका मांडली होती. वेन्स यांचे हे वक्तव्य ट्रम्प प्रशासनाच्या अन्य देशाच्या विषयावत हस्तक्षेप न करण्याच्या धोरणांनुरुप होते. परंतु केवळ 24 तासतांच अमेरिकेला दक्षिण आशियात विपरित घडण्याची भीती सतावू लागली. यानंतर वॉशिंग्टपासून इस्लामाबाद आणि दिल्लीपर्यंत कूटनीतिक हालचालींना वेग आला. भारत, पाकिस्तान आणि अमेरिका तिन्ही देशांच्या राजधानींमध्ये वरिष्ठ स्तरावर सूत्रं हलल्याचे समजते. अमेरिकेचे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने यावर विस्तृत अहवाल प्रकाशित केला आहे.
उपाध्यक्ष वेन्स आणि विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी आण्विक संकटाची भीती सतावत होती. 25 वर्षांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही याच संकटाच्या भीतीने ग्रासले होते. तेव्हा कारगिल युद्धादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आण्विक रुप धारण करू शकते अशी भीती होती.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये 26 निर्दोष पर्यटकांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आल्यावर 7 मे रोजी भारताच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईमुळे या संघर्षाला आण्विक स्वरुप प्राप्त होण्याचा धोका निर्माण झाला होता. भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या नूर खान वायुतळापर्यंत पोहोचल्यावर अमेरिकेची चिंता वाढली. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची देखरेख करणारे मुख्यालय नूर खान वायुतळाच्या आसपासच आहे.
भारत आणि पाकिस्तान वायुदलादरम्यान गंभीर हवाई संघर्ष सुरू झाला होता. पाकिस्तानने भारताचे सामर्थ्य तपासण्यासाठी भारताच्या हवाईक्षेत्रात 300-40 ड्रोन्स पाठविले होते. परंतु पाकिस्तानच्या रावळपिंडीत नूर खान वायुतळावर शुक्रवारी रात्री उशिरा स्फोट झाला, हा वायुतळ इस्लामाबादला लागून असलेल्या शहरात आहे. नूर खान वायुतळ इस्लामाबादपासून केवळ 10-15 किलोमीटर अंतरावर आहे. एक सुपरसोनिक क्षेपणास्त्र हे अंतर केवळ 3-4 सेकंदांत गाठू शकते.
नूर खान वायुतळ पाकिस्तानचे महत्त्वपूर्ण सैन्य ठिकाण आहे. हे पाकिस्तानच्या सैन्याचे सेंट्रल ट्रान्सपोर्ट हब आहे. येथूनच पाकिस्तानी विमाने आकाशात इंधन भरतात. हे केंद्र पाकिस्तानी लढाऊ विमानांना उ•ाण करण्यास मदत करते. याचबरोबर हे केंद्र पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजनच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजन पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची देखरेख आणि सुरक्षा करते. पाकिस्तानकडे सुमारे 170 किंवा त्याहून अधिक अण्वस्त्रs असल्याचे मानले जाते. ही अण्वस्त्रs पूर्ण देशात फैलावलेली असल्याचेही मानले जाते.
पाकिस्तानला सर्वात मोठी भीती स्वत:ची न्यूक्लियर कमांड अथॉरिटी नष्ट करण्याची आहे. नूर खान वायुतळावर भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला भारत असे करू शकतो अशा इशाऱ्याच्या स्वरुपात समजले जाऊ शकते. नूर खान वायुतळावरील भारताच्या हल्ल्याचा अर्थ भारताकडे पाकिस्तानची न्युक्लियर कमांड अथॉरिटी नष्ट करण्याची क्षमता आहे असा काढण्यात आला. तसेच भारताने पाकिस्तानच्या अनेक वायुतळांवर हल्ला करत त्यांना ध्वस्त केले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलाविली होती. नॅशनल कमांड अथॉरिटी हा समूह अण्वस्त्रांचा वापर कसा आणि कधी करावा याचा निर्णय घेत असतो. 2000 साली स्थापन नॅशनल कमांड अथॉरिटीचे अध्यक्षत्व नाममात्र स्वरुपात पंतप्रधान करतात आणि यात वरिष्ठ मंत्री आणि सैन्यप्रमुख सामील असतात. परंतु प्रत्यक्षात या समुहामागे खरी शक्ती सैन्यप्रमुख सैयद असीम मुनीरच आहेत. तर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलाविण्यात आली नसल्याचा दावा केला.
युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी आसिफ यांनी अण्वस्त्र पर्याय असल्याचे मान्य केले, परंतु आम्ही याला एक अत्यंत दूरवरील शक्यता म्हणून पहावे, यावर चर्चा देखील केली जाऊ नये असे वक्तव्य केले.
भारताच्या प्रत्युत्तरानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्रालय पेंटागॉनमध्ये नव्या परिस्थितीवर चर्चा झाली. काही वक्तव्यं आणि दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा पुरेशी नसल्याचे व्हाइट हाउसचे मत झाले. तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातचा हस्तक्षेपही प्रभावी ठरला नव्हता.
याचमुळे प्रारंभी अनुच्छुक दिसणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने दक्षिण आशियात हस्तक्षेप केला. स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते अशी चिंता ट्रम्प प्रशासनाला सतावत होती. 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारत-पाकिस्तानने शस्त्रसंधी जाहीर केली.
तत्पूर्वी ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी ‘धोकादायक गुप्तचर माहिती’ प्राप्त झाली होती. परंतु त्यांनी याच्या संवेदनशीलतेमुळे गुप्त माहितीचे स्वरुप जाहीर करणे टाळले. परंतु यामुळे अमेरिकेच्या नेतृत्वाला तत्काळ पावले उचलणे भाग पडले. यानंतरच्या घडामोडींमध्ये वेन्स, अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो आणि व्हाइट हाउसच्या चीफ ऑफ स्टाफ सूजी विल्स सामील होत्या.
वेन्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन करण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना माहिती दिली. फोन कॉलदरम्यान वेन्स यांनी मोदींसमोर आठवड्याच्या अखेरपर्यंत ‘तणावात नाट्यामय वद्धीच्या अत्याधिक शक्यते’विषयी चिंता व्यक्त केली. अण्वस्त्रसज्ज दोन्ही देशांदरम्यान संवाद पुन्हा सुरू करण्यस अमेरिकेने स्वत:ची भूमिका आवश्यक मानली. परंतु ट्रम्प प्रशासन या चर्चेत सामील नव्हते, त्याची भूमिका केवळ दोन्ह देशांदरम्यान चर्चेला सुविधाजनक करण्यापुरतीच मर्यादित होती.