महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभेसाठी महिला मतदारांचा टक्का वाढला! पुरूष मतदारांच्या सरासरीत 974 मतांचा फरक

03:35 PM Sep 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
women voters
Advertisement

विधानसभेच्या अंतिम यादीत एकूण 32 लाख 51 हजार 192 मतदार : 65 हजार 454 नवमतदार वाढले : जिल्हाप्रशासनासह राजकीय घडामोडींना वेग

इम्रान गवंडी कोल्हापूर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 65 हजार 454 इतक्या नवमतदारांनी नाव नोंदणी केली असल्याने नवमतदारांचा टक्का वाढला आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत एकूण 32 लाख 51 हजार 192 मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये महिलांचा टक्का वाढला असुन पुरूष मतदारांच्या सरासरीत 974 मतांचा फरक आहे.

Advertisement

सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच अंतिम मतदार यादी जाहीर झाली असल्याने निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत अंतिम मतदार यादीत 18 ते 19 वयोगटामध्ये 14 हजार 221 मतदारांची नव्याने भर पडली आहे. प्रारूप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 51 हजार 233 होती. अंतिम मतदार यादीत 65 हजार 454 इतकी झाली आहे. तसेच 20 ते 29 या वयोगटात 24 हजार 72 मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये सैनिकी मतदार 8 हजार 655 इतके आहेत.

Advertisement

यंदा राज्यात विधानसभेची महत्वाची निवडणुक हेणार आहे. यासाठी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आत्तापासूनच उडत आहेत. त्यातच अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध झाल्याने प्रशासनासह राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार आहे. राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का वाढला आहे.

निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 6 ऑगस्ट रोजीच्या प्रारूप मतदार यादीत 59 हजार 612 मतदारांची नाव नोंदणी झाली होती. तसेच 8 हजार 85 मतदारांची वगळणी करण्यात आली होती.

अंतिम मतदार यादीतील मतदानाची आकडेवारी
-पुरूष मतदार : 16 लाख 47 हजार 62
-महिला मतदार : 16 लाख 3 हजार 949
-तृतीयपंथी : 181
एकूण मतदार : 32 लाख 51 हजार 192

20 ते 29 वयोगटातील 24 हजार मतदार वाढले
6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत तर 20 ते 29 वयोगटातील मतदार संख्या 5 लाख 96 हजार 359 होती. अंतिम मतदार यादीत 6 लाख 20 हजार 431 इतकी झाली आहे. अंतिम यादीत 20 ते 29 वयोगटातील 24 हजार मतदार वाढले आहेत.

3 हजार 284 मृत मतदार वगळले
सर्वेक्षणात आढळलेल्या मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यानुसार 3 हजार 284 मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

महिलांचा टक्का वाढला...
महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत वाढ झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. ‘मतदाता सेवा पोर्टल’ व ‘वोटर हेल्पलाइन अप’वर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी

Advertisement
Tags :
Legislative Assembly averagemale electorateThe percentage women voters
Next Article