For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चराठा - गावठणवाडी प्रलंबित पुलाचा प्रश्न अखेर मार्गी

04:06 PM Jan 31, 2025 IST | अनुजा कुडतरकर
चराठा   गावठणवाडी प्रलंबित पुलाचा प्रश्न अखेर मार्गी
Advertisement

१.२५ कोटी निधी मंजूर ; चराठावासियांमध्ये समाधान

Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

चराठा - गावठणवाडी नवसरणी मार्गावरील गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या पुलासाठी १.२५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायणा राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती गौरी पावसकर, चराठा देवस्थानचे प्रमुख मानकरी राजाराम परब, चराठा सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच अमित परब, माजी सरपंच बाळू वाळके, विल्यम सालढाणा, मंगेश धुरी, माजी उपसरपंच जॉनी फेराव, देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण परब, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता प्रमोद लोहार, ठेकेदार श्री पवार, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, माजी पंचायत समिती सदस्य विश्राम कांबळे,भाजपा बांदा मंडळ उपाध्यक्ष सचिन बिर्जे, माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, उपविभाग प्रमुख राजू कुबल, ग्रामपंचायत सदस्य राजन परब अमर चराटकर, वृंदा मेस्त्री, लुईझा डिसोजा, गौरी गावडे, श्रावणी बिर्जे, इलियास राजगुरू, माजी पंचायत समिती सदस्य विश्राम कांबळे, क्लेटस डिसोजा, नारायण जाधव, चंद्रकांत वेजरे, पोलीस पाटील सचिन परब, संजय माजगावकर, मायकल डिसोजा, दिगंबर पावसकर, बस्त्याव डिसोजा, श्री रेडकर, श्री तुळसकर आदी उपस्थित होते.चराठा - नवसरणी या मुख्य रस्त्या दरम्यानचे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे हे पूल जीर्ण झाल्यामुळे या पुलाची दयनीय अवस्था झाली होती. या पुलावर भगदाड तसेच खड्ड्यांच्या साम्राज्य पसरले होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता. तसेच या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात हा पुल अनेक वेळा पाण्याखालीच असतो. त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे हा पूल निर्लेखीत करून या ठिकाणी नविन पुल मंजूर करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. चराठा ग्रामपंचायतीने याबाबत अनेक वेळा संबंधितांचे लक्ष वेधले. या ठिकाणी नवीन पुल पूल बांधण्याचे ग्रामस्थांचे अनेक वर्षां पासूनचे स्वप्न साकार होत असल्यामुळे चराठावासियांनी समाधान व्यक्त केले. या पुलाच्या शुभारंभ प्रसंगी चराठावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.