For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एआय ‘क्षेत्रातील ‘पाटील इफेक्ट’ने आयटी कंपन्यांना दणका!

06:40 AM Feb 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘एआय ‘क्षेत्रातील ‘पाटील इफेक्ट’ने आयटी कंपन्यांना दणका
Advertisement

फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात जगातील ‘आयटी’ आणि ‘एआय’ उद्योगांना प्रचंड मोठा हादरा बसला. जगभरातील या क्षेत्रातील सर्वच बड्या दादा कंपन्यांनी मिळून, त्यांच्या शेअर बाजारातील मूल्यामधून, 25 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य एकाच दणक्यात गमावले. शेअर बाजारातील घसरणीमुळे त्यादिवशी इन्फोसिस व टीसीएससारख्या मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांनीही जवळपास दोन लाख कोटी रुपयांचा फटका झेलला. याचे कारण ‘अँथ्रोपिक’ या एआय क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या कंपनीने एआयमधील सर्वात पुढची आवृत्ती ठरणारे,

Advertisement

“क्लॉड”, हे नवे टूल बाजारात आणले. त्याने तंत्रजग हादरले. पडझड झाली.

मागच्या आठवड्यात ‘अँथ्रोपिक एआय’ नावाचे एक वादळ आले आणि सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना पळता भुई थोडी झाली. अँथ्रोपिक पीबीसी ही एक अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे आहे. अँथ्रोपिकची स्थापना 2021 मध्ये ओपन एआयच्या माजी सदस्यांनी केली होती. अँथ्रोपिकने क्लॉड हे एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधन सादर केले आहे. ज्याची डझनभर इतर सॉफ्टवेअरची जागा घेण्याची क्षमता आहे. एआय सहकार्यासारखे दिसणारे हे उपकरण फायली वाचू शकते, फोल्डर्स व्यवस्थित करू शकते आणि कागदपत्रे देखील तयार करू शकते. अमेरिकन एआय फर्मच्या घोषणेमुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये खळबळ उडाली व त्यामुळे अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या, भारतीय आयटी स्टॉक तसेच युरोपमधील कायदेशीर सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये मोठी विक्री झाली. तर झाले असे की, 30 जानेवारीला या अँथ्रोपिक एआयने 11 नवीन अॅप बाजारात लाँच केले. यात कायदेशीर, विक्री, विपणन व डेटा विश्लेषण कार्यांमधील कामे स्वयंचलित करण्याच्या उद्देशाने हे केले जाते. ‘सास्पोकॅलिप्स’ च्या केंद्रस्थानी असलेले प्राथमिक साधन कायदेशीर क्षेत्राला लक्ष्य करणारे प्लग-इन आहे, तर इतर 10 साधनेदेखील आहेत. उत्पादकता, एंटरप्राइझ शोध, विक्री, वित्त, मार्केटिंग, ग्राहक समर्थन, संशोधन या सगळ्यांचा समावेश आहे.जसे हातांनी काम करण्यापेक्षा एखाद्या मशीनची क्षमता अधिक असते, तसेच काहीसे या एआयमुळे घडते. भारतातील बाजारपेठेतील प्रतिक्रिया ही या चिंतेमुळे आहे की, एआय

Advertisement

सॉफ्टवेअर व आयटी सेवा कंपन्यांसाठी स्पर्धात्मक लँडस्केप मूलभूतपणे बदलू शकते, ज्यामुळे लक्षणीय नुकसान होऊ शकते. विश्लेषकांनी असे नमूद केले की, जर एआय अनेक कार्ये स्वयंचलित करू शकत असेल तर, ती प्रदान करण्याभोवती तयार केलेल्या आयटी सेवांना अस्तित्वातील आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. या सगळ्यामुळे बाजारात सगळ्या आयटी कंपन्यांना खूप फटका बसला व इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी, कोफोर्ज सारखे दिग्गज अगदी 10 ते 15 टक्के पडले. निफ्टी आयटी इंडेक्स 29 जानेवारी रोजी 42915.50 ला होता. तो पडझडीमुळे 6 फेब्रुवारीला 356110.05ला येऊन ठेपला, म्हणजे जवळजवळ 8 टक्के खाली आला.

‘पाटील इफेक्ट’ काय आहे?

अँथ्रोपिकच्या अपडेटसह भारतीय वंशाचे टेक एक्झिक्युटिव्ह राहुल पाटील यांचे नाव चर्चेत आले. राहुल पाटील यांचा प्रवासदेखील प्रेरणादायी आहे. राहुल पाटील हे ऑक्टोबर 2025 मध्ये अँथ्रोपिकमध्ये सामील झाले आणि त्यांनी कंपनीच्या टेक टीम आणि पायाभूत सुविधांना पूर्णपणे ऑप्टिमाइझ केले. त्यांनी महागड्या चिप्समधून अधिक उत्पादन काढण्याचे मार्ग विकसित केले, ज्यामुळे एआय चालवण्याचा खर्च कमी झाला. मेमरी मॅनेजमेंट आणि जलद प्रक्रिया यासारख्या तंत्रज्ञानामुळे क्लाउड स्वस्त आणि जलद झाला. आता, कंपनी अनेक उद्योगांना थेट ‘नेहमी चालू’ एआय एजंट प्रदान करू शकते. वॉल स्ट्रीटवर, या बदलाला ‘पाटील इफेक्ट’ म्हटले जात आहे. अहवालानुसार, त्यांनी कंपनीच्या एआय टूल, क्लाउडला एंटरप्राइझ स्तरावर बळकट करण्यात मोठी भूमिका बजावली. अँथ्रोपिकचा प्रमुख तांत्रिक अधिकारी (सीटीओ) भारतीय तरूण आहे. त्यांचे नाव राहुल पाटील! बेंगळूरूमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर असणारे व सध्या अमेरिकेतील सिएटलमध्ये वास्तव्य पाटील यांनी बेंगळूरूतील फार प्रसिद्ध नसणाऱ्या महाविद्यालयातून इंजिनिअरींगची पदवी घेतली.

अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. नऊ वर्षे ते मायक्रोसॉफ्टमध्ये होते. त्यादरम्यान त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. अमेझॉनमध्येही ते होते. तिथे वेब सर्विसेस विभागात त्यांनी महत्त्वाचे काम केले. प्रचंड क्षमतेचे डेटा प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म उभे करण्यात ते आघाडीवर राहिले. त्याचा लाभ मोबाईल

अॅप्लिकेशन डेव्हलपरना तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) काम करणाऱ्या तंत्रज्ञांना झाला. आयओटी हा एआयचाच मावसभाऊ म्हणावा लागेल! सेन्सर, सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून इलेक्ट्रिकल वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या जातात, एकमेकांमध्ये संवाद साधतात, ते तंत्रज्ञान म्हणजेच आयओटी. नंतर पाटील यांनी ओरॅकलमध्ये क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर विभागात उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर ते स्ट्राईप या कंपनीत होते. फायनान्शिअल सेवा देणारी ही कंपनी आहे. तिथे विविध मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या पगारांचे व्यवस्थापन करण्याचे

सॉफ्टवेअर हाताळले जाते. त्यांच्याच कार्यकाळात स्ट्राईप कंपनीने एक ट्रिलियन इतक्या प्रचंड प्रमाणातील पगारपत्रकांची हाताळणी करण्याचा विक्रम नोंदवला होता. अशाप्रकारे सर्वच मोठ्या टेक जायंट कंपन्यांचा अनुभव घेऊन नंतर ते गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अँथ्रोपिकमध्ये दाखल झाले.

प्रा. डॉ. गिरीश नाईक

Advertisement
Tags :

.