For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनएसईचा आयपीओचा मार्ग अखेर मोकळा

06:07 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनएसईचा आयपीओचा मार्ग अखेर मोकळा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज)यांना आयपीओ लॉन्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. बाजारातील नियामक सेबीने आयपीओसाठी परवानगी दिली आहे. येत्या काळामध्ये एनएसई व्यापारी, बँकर आणि कायदे तज्ञांच्या सोबत बसून आपला आयपीओची तयारी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये एनएसईचा आयपीओ लॉन्च होऊ शकतो.

याआधीही केला होता अर्ज

Advertisement

2016 मध्ये एनएसईने आयपीओकरिता सर्वात आधी अर्ज सादर केला होता. परंतु त्यावेळी नियामक सेबी आणि कायद्याच्या संदर्भातील मुद्यांमुळे एनएसईला आपला अर्ज परत मागे घ्यावा लागला होता. 2025 जूनमध्ये एनएसईने पुन्हा सेबीकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सुमारे 1400 कोटी रुपये भरण्यासंदर्भात एनएसईने तयारी दर्शवली होती. नोव्हेंबर 2025 च्या आर्थिक अहवालामध्ये एनएसईने 1297 कोटी रुपयांची व्यवस्था केल्याचे सांगितले जात आहे. याआधी कंपनीने जवळपास 100 कोटी रुपये जमा केले होते.

आयपीओबाबत...

कंपनीचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहे. सध्याचे समभागधारक आपले समभाग विक्री करू शकणार आहेत. एनएसईचे सध्याचे बाजार भांडवल मूल्य 5 लाख कोटी रुपये अंदाज् ााrत आहे. आयपीओ सादर झाला तर एनएसई भारतातील सर्वात मोठी मूल्याची सूचीबद्ध कंपनी बनू शकते.

Advertisement
Tags :

.